Headlines

ती जाम खोटारडी आहे; श्वेता आणि जया बच्चन यांनी कोणावर केला हा आरोप

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची लाडकी नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सध्या नव्या तिच्या एका शोमुळे चर्चेत आली आहे. या शोचं नाव ‘व्हॉट द हेल नव्या’ असे आहे. यात बच्चन कुटुंबाची गुपितं उघड होताना दिसत आहेत. नव्यासह तिची आई श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आणि आजी जया बच्चनही (Jaya Bachchan) या पॉडकास्ट शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. या पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये श्वेता आणि जया बच्चन यांनी नव्याला खोटारडी असल्याचं म्हटलं आहे. 

नव्याच्या पॉडकास्टच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये श्वेता आणि जया बच्चन यांनी नव्या नवेली खूप खोट बोलते असा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर ती खोट बोलू शकत नाही आणि ती प्रत्येकवेळी खोट बोलताना पकडली जाते.  यावेळी श्वेता म्हणाली,’ काही वर्षांपूर्वीच ख्रिसमस पार्टीसाठी नव्या आणि तिचा भाऊ अगस्त्य बाहेर गेले होते. दोघांनाही घरातून एका विशिष्ट वेळेत घरी परतण्यास सांगितलं होतं, पण सांगितलेल्या वेळी ते दोघं घरी आले नव्हते. तर मी नव्याला कॉल केला आणि ते कुठे आहेत आणि किती वेळ लागणार आहे हे विचारलं. त्यावर नव्याने मला सांगितलं की ते दोघंही घरी आलेत आणि घराच्या आसपासच फिरत आहेत. पण त्यावेळी दोघंही पार्टीमध्ये होते. त्यावर मी म्हटलं तुम्हाला आई मूर्ख वाटते का?’ (Jaya Bachchan reveals granddaughter Navya Nanda’s lies remembers when she caught her red handed) 

बातमीची लिंक : ‘काळानुसार धर्म बदलतो…’, रामानंद सागर यांच्या मुलानं ‘आदिपुरुष’चा केला बचाव!

याशिवाय आजी जया बच्चन यांनीही तिचा एक किस्सा सांगितला, ‘एकदा नव्या बाहेर गेली होती, जोपर्यंत मुलं घरी येत नाहीत तोपर्यंत मला झोप लागत नाही. मी उठले आणि नव्याची वाट पाहत होते. बाहेर अंधार होता आणि एवढा उशीर होऊनही नव्या घरी परतली नव्हती. त्यामुळे मी तिला कॉल केला. तर ती म्हणाली, ती बऱ्याच वेळापूर्वी घरी आली आणि तिच्या रूममध्ये आहे. जेव्हा मी तिच्या रुममध्ये गेले तेव्हा ती तिथे नव्हती आणि नंतर मी पाहिलं तर ती घरात येत होती. मी त्यावेळी तिला खोटं बोलताना रंगेहात पकडलं होतं.’

आणखी वाचा : करण जोहरबाबत शाहरुख खानचं मोठ वक्तव्य; ‘होय, आम्ही एकत्र…’

बातमीची लिंक : आलियानंतर ‘या’ कारणामुळे बिपाशा बासू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय म्हणाले नेटकरी

दरम्यान, या आधी नव्याच्या या शोमध्ये श्वेतानं आई जया बच्चन मारहान करायची या विषयी सांगितलं. श्वेता तिच्या लहानपणीच्या आठवणी आणि extra-curricular activities मध्ये श्वेतानं सहभागी व्हावे यासाठी तिची आई भाग पाडायची या विषयी सांगत म्हणाली, ‘ती एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये सहभागी होण्यास मला भाग पाडायची. मला भरतनाट्यम, हिंदी शास्त्रीय संगीत, स्विमिंग, सितार आणि पियानो शिकावं लागलं. पण ती मला सतत कानशिलात मारायची. मी खूप मार खाल्ला आहे. एकदा तर तिनं मला इतकं मारलं की माझ्यावर पट्टी तुटली होती.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *