Headlines

टाटा सन्सच्या अध्यक्षांकडून रणवीर सिंगला मोलाचा सल्ला, म्हणाले…

[ad_1]

मुंबई :  सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीरनं पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती. त्यावरून काही लोकांनी त्याचा विरोध केला तर काही लोक त्याच्या समर्थनाथ पुढे आले. अनेकांनी तर रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल केले. दरम्यान, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर (N Chandrasekaran)  यांनी रणवीरला एक मोलाचा सल्ला दिला आहे. 

सोमवारी मुंबईत IAA Leadership Awards 2022 चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एन चंद्रशेखर यांनी रणवीरला हा मोलाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रणवीर हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर आयएए लिडरशीप पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या एन चंद्रशेखर यांचे ते भाषण व्हायरल झाले आहे. त्या सोहळयाला देशातील वेगवेगळे उद्योगपती उपस्थित होते. दरम्यान, या सोहळ्यात रणवीर सिंग, सोनु सूद यांनी देखील हजेरी लावली होती. रणवीरनं त्यांना अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नांमध्ये रणवीरनं वेळेचे नियोजन कसे करावे यावर त्याला एखाद्या सल्ल्याची गरज असल्याचे सांगितले. रणवीरच्या या प्रश्नावर एन चंद्रशेखर यांनी दिलेल्या उत्तराने रणवीरला हसू आवरेना.

चंद्रशेखरन यांनी रणवीरला एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, हे बघ रणवीर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आणि कुणाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करायचा नाही. चंद्रशेखर यांनी रणवीरला टाइम मॅनेजमेंट यावरुन हा सल्ला दिला आहे. त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी चंद्रशेखर यांनी रणवीरचं कौतूकही केलं. ते म्हणाले, ‘तू एक उत्साही अभिनेता आहे. तुझं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. माझ्याकडे तुझ्याइतकी उर्जा किंवा त्यातली किमान त्यातील 10 टक्के तरी असती तरी…मी माझं जीवन थोडं वेगळं झालं असतं. तू हे सगळं कसं करतोस हे मला कळत नाही.’

रणवीरनं चंद्रशेखर यांना करोनामुळे मनोरंजन विश्वावर झालेल्या परिणामबद्दल प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी, ‘याचा जास्त विचार करण्याची काही गरज नाही. केवळ मनोरंजनच नाही, तर अनेक सेक्टरला त्याचा फटका बसला आहे. तेव्हा कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका’ असेही चंद्रशेखर यावेळी म्हणाले.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना या कार्यक्रमात ‘बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अभिनेता रणवीर सिंगला ‘ब्रँड एंडोर्सर ऑफ द इयर’चा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान एका फायरसाइड चॅटमध्ये, चंद्रशेखरन यांनी टाटा समूहातील नेतृत्वापासून ते रतन टाटा यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींपर्यंतचे त्यांचे अनुभव देखील शेअर केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *