Headlines

“….तर मी घरात घुसून मारेन,” अमेय खोपकरांचा शिवसेना नेत्यांना इशारा | will enter in home and beat amey khopkar threat to shivsena leader rmm 97

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी अलीकडेच मुस्लिमांना इशारा दिला होता. ज्या हिंदूद्वेष्ट्या मुस्लिमांना फटाक्यांचा त्रास होतोय, त्यांनी देश सोडून निघून जावं, असं विधान खोपकरांनी केलं. खोपकरांच्या या विधानावरून सोशल मीडियात त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही अमेय खोपकर यांच्यावर टीकास्र सोडलं.

किशोरी पेडणेकरांच्या टीकेला अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जे शिवसेनेचे नेते माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करतील, त्यांच्या घरात घुसून त्यांना मारेन, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे. यावेळी अमेय खोपकर म्हणाले की, किशोरी पेडणेकर यांनी अशा विषयांवर बोलू नये. सध्या त्यांचं पक्षातील अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी आदळआपट करायला सुरुवात केली आहे. सुषमा अंधारे यांचं पक्षातील महत्त्व वाढत आहे. यामुळे किशोरी पेडणेकरांचा जळफळाट होत आहे. यातूनच त्यांनी माझ्यावर टीका केली आहे.

हेही वाचा- “…तर बॅगा भरायच्या आणि देश सोडून जायचं,” मनसेकडून मुस्लिमांना इशारा, म्हणाले “अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांची गरजच नाही”

शिवसेनेच्या नेत्यांना उद्देशून खोपकर पुढे म्हणाले की, मी माझ्या विधानावर अजूनही ठाम आहे, मला कितीही ट्रोल केलं तरी चालेल. मला शिव्या घातल्या तरी चालतील. शिव्या घालणारे लोक हे शिवसेनेचेच आहेत. जे फक्त फेसबुकवरच पडीक असतात. जर शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्यावर खालच्या पातळीची टीका केली. तर मी त्यांना घरात घुसून मारेन. माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करायची नाही. टीका करायची असेल तर राजकीय टीका करा. वैयक्तिक टीका करायची नाही, हे मी शिवसेनेच्या लोकांना दम देऊन सांगतोय, अशी प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी दिली आहे.

अमेय खोपकरांनी नेमकं काय ट्वीट केलं होतं?
“ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात राहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके फोडणारच. आम्ही वर्षानुवर्षे भोंग्यांचा त्रास सहन करतोय, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा,” असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *