Headlines

‘तळपायाची आग मस्तकात जाते…’ ; बिग बींच्या लेकिवर असं म्हणण्याची वेळ का आली?

[ad_1]

Shweta Bachchan Nanda : प्रत्येक क्षेत्रात मानाचं स्थान असणाऱ्या काही व्यक्ती असतात, काही कुटुंब असतात. कलाजगतामध्ये तो मान मिळतो बच्चन (Amitabh Bachchan and family) कुटुंबाला. बिग बी, अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबानं मनोरंजन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कायमच प्रेक्षक त्यांचे ऋणी राहतील. हे कुटुंब सर्वांनाच मनाच्या अगदी जवळचंच. पण, अनेकदा आपलं आपलं म्हटल्या जाणाऱ्या याच कुटुंबावर, कुटुंबातील व्यक्तीवर अशा काही टीका केल्या जातात जे पाहता धक्काच बसतो. बिग बींचा मुलगा, अभिनेता (Abhishek bachchan) अभिषेक बच्चन या टीकेला बऱ्याचदा बळी गेला आहे.

चित्रपटांमध्ये अभिषेकला फारशी प्रसिद्धी मिळवता आलेली नाही. पण, त्याच्या परीने व्यवसाय क्षेत्रात मात्र तो पुढे आहे. पण, हीच बाब काहींच्या लक्षातही न आल्यामुळे त्याच्यावर अनेकदा टीकेची झोड उठवण्यात आली हे. म्हणजे काहींनी तर त्याला बेरोजगार म्हणायलाही कमी केलेलं नाही.

आपल्या भावाविषयीच्या या सर्व प्रतिक्रिया पाहून बिग बींची लेक (Shweta Bachchan nanda) श्वेता बच्चन नंदा हिला मात्र राग अनावर होतो. एरव्ही शांत असणाऱ्या श्वेतानं नुकतंच मुलगी नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये (Podcast) हजेरी लावत याबाबतचं आपलं मत स्पष्ट केलं.

भावाची तुलना वडिलांशी केली जाणं योग्य नसल्याचं ती यादरम्यान म्हणाली. शिवाय जेव्हाजेव्हा अभिषेकची खिल्ली उडवली जाते, तेव्हा तेव्हा आपल्या संतापाची परिसीमा ओलांडली जाते, असंही तिनं स्पष्ट केलं.

‘मला एकाच गोष्टीमुळं वेड लागायची वेळ येईल. कारण ते (नेटकरी) कायमच त्याला (अभिषेकला) निशाण्यावर धरतात’, असं म्हणत अभिषेकची फिरकी घेतली जाते तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते या शब्दात श्वेतानं नाराजीचा सूर आळवला. तुम्हाला माहितीये का काही? असा प्रतिप्रिश्न करत तिनं खिल्ली उडवणाऱ्या अतिउत्साही नेटकऱ्यांचा समाचार घेतला.

एखाद्या व्यक्तीचं यश तुम्ही पूर्णपणए दुर्लक्षित ठेवता, कारण त्यानं कुटुंबातील अमुक एका व्यक्तीहून चांगलं प्रदर्शन केलं नाही, पण याचा अर्थ असाही नाही की त्यानं काम केलं नाहीये… हे अत्यंत निराशाजनक आहे आणि गेली 20 वर्षे हेच सुरुये असं म्हणत असताना श्वेताच्या आवाजातील आर्तता जाणवली.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *