Headlines

T20 World Cup: वर्ल्ड कपमधील सामन्याआधीच भारत-पाकिस्तानमध्ये राडा,जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया (Team India) टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. येत्या 16 ऑक्टोंबरपासून या वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पहिली लढत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind Vs Pak)  होणार आहे. या लढती आधीच वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. नेमकं असं काय घडलं आहे की, या दोन्ही संघाच्या लढती आधी वातावरण तापलय, हेच जाणून घेऊयात. 

टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातला कोणताही सामना असो, सामन्याआधीच कोणता ना कोणता वाद रंगतोच. कधी दोन्ही संघाचे दिग्गज एकमेकांमध्ये भिडतात, तर कधी संघातील खेळाडूंच एकमेंकांना डिवचताना दिसतात. या प्रकरणातही असेच झाले आहे. पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटरने मोठं विधान केलं आहे. या विधानातून त्याने टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 

 

T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला धक्का, प्रसिद्ध खेळाडूने दिले संघ सोडण्याचे संकेत 

 

नेमका वाद काय? 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी टी20 वर्ल्ड कपपुर्वी (T20 World Cup) दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध आणि खेळाबाबत मोठं विधान केले आहे. रमीझ राजा म्हणाले आहेत की, कौशल्य आणि प्रतिभेपेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ही एक मानसिक लढाई आहे, ज्यामध्ये जिंकणे खूप कठीण आहे, असे त्यांनी सांगितले होते.

रमीझ राजा (Ramiz Raja) पुढे म्हणाले की, वर्ल्ड़ कपमध्ये पाकिस्तानला अंडरडॉग मानले जायचे, पण आता परिस्थिती बदलली आहे. भारताने आम्हाला आदर देण्यास सुरुवात केली असल्याचे मोठं विधान त्यांनी केले आहे. 

ते पुढे म्हणतात की, याचे श्रेय पाकिस्तानला द्यायला हवे, कारण आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत आणि अब्ज डॉलर्सच्या क्रिकेट संघाला हरवत आहोत. आमच्याकडे भारतापेक्षा कमी संसाधने आहेत, तरीही आम्ही त्यांच्या संघाला हरवत आहोत. असे विधान करून रमीझ राजा यांनी टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे 

रमीझ राजा (Ramiz Raja) यांच्या या विधानाने टी20 वर्ल्ड कपपुर्वीच मैदानाबाहेर भारत-पाकिस्तानमध्ये  (Ind Vs Pak) वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.  

दरम्यान टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये टीम इंडिया (Team India)  पाकिस्तानशी भि़डणार आहे. याआधी 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडियाला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. 

टी-20 वर्ल्डकपसाठी संघ
टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.

पाकिस्तान संघ : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, शान मसूद, उस्मान कादिर.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद हारिस, फखर जमां आणि शाहनवाज दहानी.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *