Headlines

T20 World Cup : जसप्रीत बुमराहची पत्नी इतकी कोणावर संतापली?, म्हणाली ‘खुद जो चप्पल जैसी शकल लेके….’

[ad_1]

T20 World Cup : भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध (India vs England) टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य सामन्यासाठी सज्ज झाला आहे. संघाची एकंदर कामगिरी पाहता अंतिम सामन्यासाठी Team India नं धडक मारावी, असंच सर्वांना वाटत आहे. तिथं संघामध्ये काही खेळाडूंची उणीव मात्र कायमची जाणवत आहे. यापैकीच एक नाव म्हणजे (jasprit bumrah) जसप्रीत बुमराह. T20 World Cup सुरु होण्यापूर्वीच दुखापतीच्या कारणामुळे बुमराह वर्ल्ड कपचा भाग होऊ शकला नाही. पण, त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) मात्र या स्पर्धेमध्ये अँकरच्या भूमिकेत दिसत आहे. (t20 World Cup indian cricketer jasprit bumrah wife sanjana ganesan gets angry on social media troller)

सामन्यांपूर्वी किंवा सामन्यांनंतर संजनानं बऱ्याच खेळाडूंच्या मुलाखती, विश्लेषणपर चर्चा करत आपलं काम चोखपणे बजावलं. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून संजनानं तिच्या परीनं या स्पर्धेबाबतची माहिती फॉलोअर्स आणि क्रिकेटप्रेमींना दिली.

फॅशन गोल्सच्या बाबतीतही संजना मागे नाही 

फक्त क्रिकेट सामन्यांची चर्चाच नव्हे, तर फॅशन गोल्स देण्याच्या बाबतीतही संजना मागे राहिली नाही. तिनं सातत्यानं सोशल मीडिया पोस्ट करत अप्रत्यक्षरित्या कॉर्पोरेट लूक्ससाठी अफलातून फॅशन टीप्स दिल्या. पण, याच सोशल मीडिया पोस्टमुळं विचित्र Comment करत एका नेटकऱ्यांनं तिला डिवचलं आणि बस्स, तिथेच संजनाचा संताप अनावर झाला. 

 

ट्रोलर्सच्या विचित्र कमेंटला संजनाचं सडेतोड उत्तर 

‘Adelaide मध्ये सध्याच्या घडीला वातावरण कमालीचं सुंदर आहे…’, असं कॅप्शन संजनानं तिच्या पोस्टला दिलं. यामध्ये ती एका लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत होती. संजनानं (Sanjana Ganeshan instagram) ही पोस्ट करताच एका नेटकऱ्यानं त्यावर कमेंट केली, ‘मॅम तुम्ही इतक्याही सुंदर नाही, मग बुमराहला कसं पटवलं?’

ही कमेंट पाहून संजनाच्या रागाचा पारा चढला आणि तिनं त्याच्याच शब्दांत उत्तर देत लिहिलं, ‘…और खुद जो चप्पल जैसी शकल लेकर घूम रहे हो उसका क्या?’. संजनाचं हे रुप पाहिल्यानंतर त्या नेटकऱ्याचा चुकीची जाणीव झाली आणि त्यानं तिची माफी मागितली. 

t20 World Cup indian cricketer jasprit bumrah wife sanjana ganesan gets angry on social media troller

परखड मतं मांडण्यासाठी ओळखली जाते संजना 

फक्त बुमराहची पत्नी, इतक्यापुरताच मर्यादित न राहता त्याच्याशी लग्नगाठ बांधण्याच्या बरंच आधीपासून संजनानं स्वत:ची वेगळी ओळख तयार केली होती. तिनं कायमच विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे. पण, यावेळी मात्र तिच्या स्वभावाची अधिक स्पष्टपणे जाणीव झाली. थोडक्यात यापुढे संजनाविषयी कोणीही काही बोलताना दोनदा विचार करेल हेच खरं.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *