Headlines

T20 World Cup पू्र्वी स्टार खेळाडूला सुनावली पोलीस कस्टडी, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

[ad_1]

पर्थ : T20 World Cup 2022 यंदाच्या टी20 वर्ल्ड कपला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्वंच संघ झाले असून रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान आता वर्ल्ड कपला (T20 World Cup) अवघे तीन दिवस उरले असताना क्रिकेट वर्तुळात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टार क्रिकेटरला पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. हा स्टार खेळाडू कोण आहे ? कोणत्या आरोपाखाली त्यांना कस्टडी सुनावण्यात आली आहे, हे जाणून घेऊयात. 

हे हि वाचा : T20 World Cup 2022: क्रिकेटमध्ये ‘हा’ कर्णधार करतो सर्वाधिक कमाई, नेटवर्थ जाणून घ्या

स्टार क्रिकेटर आणि नेपाळ संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाला (Sandeep Lamichhane) पोलीस कस्टडी (Police Custody)  सुनावण्यात आली आहे. काठमांडूच्या जिल्हा न्यायालयाने आज त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लामिछानेवरील (Sandeep Lamichhane Police Custody) एका गंभीर प्रकरणातील आरोपाची चौकशी अद्याप सुरू असून, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी 6 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने लामिछाने याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 

पोलिसांसमोर सरेंडर झाला 
लामिछाने (Sandeep Lamichhane) याने नेपाळ पोलिसांसमोर सरेंडर केले होते. लामिछानेला (Sandeep Lamichhane Police Custody) त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, काठमांडू येथून अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. नेपाळ सरकारने इंटरपोल म्हणजेच आंतरराष्ट्रीय पोलिसांची मदत मागितली, त्यानंतर लामिछाने नेपाळला परतला होता. लामिछाने नेपाळला परतण्यापूर्वी नेपाळ पोलिसांना आणि तपासात सर्वांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. नेपाळला परतण्यापूर्वी त्याने स्वतःला निर्दोष घोषित केले होते. आपण स्वत:ला निर्दोष सिद्ध करू, असे त्याने म्हटले होते. 

हे हि वाचा : T20 World Cup पुर्वी मोठी खेळी! ‘हा’ संघ बदलणार कर्णधार 

आरोप काय?
17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लामिछानेवर (Sandeep Lamichhane) आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लामिछानेने (Sandeep Lamichhane Police Custody) नेपाळमधील एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. केस फाईलनुसार, 21 ऑगस्ट रोजी लामिछानेने मुलीला काठमांडू आणि भक्तपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले आणि त्याच रात्री काठमांडूच्या हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. 

दरम्यान लामिछाने  (Sandeep Lamichhane) आयपीएलमध्ये दिसला होता. त्याने आयपीएलमध्ये एकूण 9 सामने खेळले आहेत. आता या प्रकरणात तो दोषी आढळतो की निर्दोष सुटतो?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *