Headlines

T20 World Cup 2022: अंतिम सामना भारत आणि या संघादरम्यान होणार! माजी कर्णधारांनं वर्तवलं भाकीत

[ad_1]

T20 World Cup 2022 Final Between These Team: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीचं गणित पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका उपांत्या फेरीच्या शर्यतीत आहेत. तर ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका, भारत आणि बांगलादेश प्रमुख दावेदार आहेत. असं असलं तरी टी 20 वर्ल्डकप 2022 विजेतेपदासाठी भारतीय संघ प्रमुख दावेदार असल्याचा दावा अनेक दिग्गजपटूंनी केला आहे. 15 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची भारतीय संघाला संधी आहे. टीम इंडियाने 2007 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाील शेवटचा टी 20 वर्ल्डकप जिंकला होता. आता टीम इंडियाकडे 15 वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे.

“टी 20 वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात होईल.”, असं भाकीत भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिनं केलं आहे. मिताली राज सध्या टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये समालोचकाची भूमिका बजावत आहे. मिताली राजनं स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, “मला वाटतं ग्रुप 2 मधून भारत आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत जागा मिळवतील. तर ग्रुप 1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड/ऑस्ट्रेलिया जागा मिळवतील” 

भारताला उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी बांगलादेशला हरवणं गरजेचं आहे. बांगलादेशला पराभूत केल्यास भारताच्या पारड्यात 6 गुण जमा होतील आणि धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग निश्चित होईल. पण या सामन्यात पाऊस झाल्यास दोन्ही संघांचं गणित किचकट होईल. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर केएल राहुल आणि आर. अश्विन यांना डावललं जाईल, असं बोललं जात आहे. 

T20 World Cup 2022: उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, न्यूझीलंड हरल्याने ऑस्ट्रेलिया…

अशी असेल प्लेईंग 11

भारत- रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनश कार्तिक, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *