Headlines

T20 World Cup 2022 पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचलेच नाहीत!

[ad_1]

Umran Malik : आगामी T20 World Cup 2022 पूर्वी टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असल्याने रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय. त्याचबरोबर दीपक चहर आणि अर्शदीप सिंह हे दोन खेळाडू देखील दुखापतग्रस्त आहेत. अशातच आता टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. एक नव्हे तर दोन खेळाडू ऑस्ट्रेलियात (T20 World Cup Australia) पोहोचले नसल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. भारताचे वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि कुलदीप सेन हे  T20 World Cup 2022 साठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होते, मात्र व्हिसातील (Visa) काही अडचणींमुळे त्यांना ऑस्ट्रेलियात जाता येणार नाही. त्यामुळे आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Umran Malik ला व्हिसा नाही

उमरान मलिकची वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2022) नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाला जाता न आल्याने तो आता मोहाली येथे होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) जम्मू-काश्मीर संघाकडून खेळताना दिसत आहे. टीम इंडियाचे बॉलर दुखापतग्रस्त असताना रोहित शर्माला उमरान मलिकची उणीव भासू शकते.

दरम्यान, उमरान मलिक (Umran Malik) सोबतच आणखी एक नेट बॉलर कुलदीप सेन (Kuldeep Sen) याचा देखील व्हिसा पुढे ढकलण्यात आल्याने कुलदीपला देखील ऑस्ट्रेलियात जाता येणार नाही. येत्या 12 तारखेला भारताचे काही राखीव खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत. त्यावेळी या दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *