Headlines

T20 World Cup 2022: कोच द्रविडसह रोहित- विराट संघातील खेळाडूंशी असं का वागले? राहून राहून सर्वांनाच पडतोय प्रश्न

[ad_1]

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2022 चा दौरा सुरु होऊन आता शेवटाच्या दिशेनं प्रवास करु लागला आहे. भारतीय संघानं या स्पर्धेमध्ये अपेक्षित कामगिरी बजावत (T20 World Cup Final) उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. Semi Final मध्ये Team India इंग्लंडच्या (Ind vs Eng) संघाशी दोन हाक करताना दिसत आहे. मजलदरमजल गाठत रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्त्वाखाली मैदारनात उतरणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी निभावली. 

मेलबर्न, पर्थ, सिडनी आणि अॅडलेड येथे जिथं संघ गेला, तिथं खेळाडूंनी आपल्या खेळाची छाप सोडली. आला अतिशय महत्त्वाच्या टप्प्यासाठी संघ अॅडलेडला पोहोचला. 10 नोव्हेंबरच्या उपांत्य सामन्यासाठी खेळाडूंनी सरावात मेहनत घेत त्यासाठीची तयारीही सुरु केली. पण, त्यादरम्यानच संघातील खेळाडूंविषयीची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

रोहित, विराट आणि कोच द्रविडनं हे काय केलं? 

भारतीय क्रिकेट संघ मेलबर्नहून adelaide साठी रवाना झाला त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि कोच राहुल द्रविड यांनी विमान प्रवासातील आपल्या Business Class च्या Seats संघातील काही खेळाडूंना दिल्या. यामागे कारणंही तितकंच महत्त्वाचं होतं. संघातील सपोर्ट स्टाफपैकी एका व्यक्तीनं यासंदर्भातील मोठा खुलासा केला. 

कोणासाठी केला हा त्याग?

संघ ज्यावेळी मेलबर्नहून अॅडलेडला निघाला तेव्हा फ्लाईटमध्ये विराट (Virat Kohli), रोहित (Rohit sharma) आणि द्रविडनं (Rahul Dravid) त्यांच्या Seats संघातील वेगवान गोलंदाजांना दिल्या. खेळाडूंना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी या Seniors नी हा त्याग केला. सध्याच्या घडीला Team मध्ये मोहम्मद शमी (Mohammad shami), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हे खेळाडू गोलंदाजीत दमदार कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत या खेळाडूंचा प्रवास आरामदायी होण्यासाठी ही पावलं उचलण्यात आल्याची माहिती समोर आली. 

का खास असतात Business Class च्या seats ? 

विमानामध्ये Business Class च्या seats अतिशय आरामदायी असतात. या सीट्समध्ये बसलं असता पाय ठेवण्यामध्ये कोणतीही अडचण होत नाही. तुलनेनं इतर सीट्सवर बसलं असता पाय ठेवण्यासाठी कमी जागा मिळते आणि लांबच्या प्रवासामध्ये यामुळं अडचण निर्माण होते. खेळाडूंना याच अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी विराट, रोहित आणि कोच द्रविडनं हा दिलदारपणा दाखवला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *