Headlines

T20 WC 2022: भारत-पाकिस्तान संघात होऊ शकते फायनल, जाणून घ्या कशी?

[ad_1]

T20 World cup 2022 : टी-20 वर्ल्डकप 2022 सेमीफायनलचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. सेमीफायनल सामन्यासाठी पहिल्या गटातून न्यूझीलंड (NZ) आणि इंग्लंड (England) संघ सेमीफायलनमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या गटात मात्र पाच संघ अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) संघ सध्या वर असले तरी देखील दोन्ही संघाना शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. भारत -पाकिस्तान (Pak vs Ind) सामना पाहण्यासाठी नेहमीच उत्सूकता असते. पण पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये (T20 WC Semifinal) पोहोचणार का?

पाकिस्तानचा संघ (Pakistan Team) सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. पण त्यासाठी त्यांना नशीबाची साथ लागणार आहे. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दुसऱ्या संघावर अवलंबून राहावं लागणार आहे. तरच फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो.

पहिल्या गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड (Eng vs NZ) सेमीफायनलमध्ये पोहोचलेत. न्यूझीलंडने 5 पैकी 3 सामने जिंकले आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. या संघाचे सात गुण होते आणि नेट रनरेट +2.113 होता. न्यूझीलंडने सुपर-12 फेरीत त्यांच्या गटात पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली. इंग्लंडनेही पाचपैकी तीन सामने जिंकले आणि एक सामना पावसामुळे गमावला. इंग्लंडचेही सात गुण होते आणि या संघाकडे नेट रनरेट +0.473 आहे. ऑस्ट्रेलियाकडे ही 7 गुण होते, परंतु या संघाचा नेटरनरेट -0.173 होता. त्यामुळे यजमान संघ शर्यतीतून बाहेर झाला आहे.

दुसऱ्या गटात भारताचे चार सामने खेळून सहा गुण मिळवले आहेत. भारताचा शेवटचा सामना झिम्बाब्वेसोबत होणार आहे आणि हा सामना जिंकून टीम इंडिया सहज उपांत्य फेरी गाठू शकते. झिम्बाब्वेला पराभूत केल्यानंतर भारताचे आठ गुण होतील आणि पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठेल.

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स (SA vs NED) यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला किंवा नेदरलँडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवात पाकिस्तानचा संघ बांगलादेशला (Pak vs Ban) पराभूत करून उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. या स्थितीत पाकिस्तानचे सहा गुण होतील, तर दक्षिण आफ्रिकेचे पाच गुण होतील.

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील शेवटचा सामना वाहून गेल्याने आफ्रिकन संघाचेही सहा गुण होतील. या स्थितीत पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल. दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगल्या धावगतीने पाकिस्तानचा संघ ब गटात दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठू शकेल.

फायनलमध्ये भारत-पाकिस्तान कसे भिडणार?

ब गटात भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचले तर भारताचा सामना इंग्लंड आणि पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होऊ शकतो. सेमीफायनल सामने जिंकल्यानंतर दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *