Headlines

T 20 World Cup Final : इंग्लंड-पाकिस्तान वर्ल्ड कप फायनल रद्द होणार?

[ad_1]

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलचा (T 20 World Cup Final) थरार रविवारी 13 नोव्हेंबरला रंगणार आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK Vs ENG) यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. पाकिस्तान न्यूझीलंडला आणि इंग्लड टीम इंडियाला (Indian Cricket Team) पराभूत करत फायनलला पोहचले आहेत. यामुळे या दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावण्यासाठी तयार आहेत. मात्र यादरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे. (pak vs eng t 20 world cup 2022 final match may be cancel due to heavy rain match day and also reserve day)

फायनल मॅच (Final) आणि राखीव अशा दोन्ही दिवशी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फायनल सामन्याच्या गेम होऊ शकतो.  यामुळे दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित केलं जाऊ शकतं. रविवारी मेलबर्नमध्ये (Melbourne) पाऊस होण्याची 95 टक्के शक्यता आहे. यामध्ये 25 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. 

पाऊस होण्याची शक्यता जवळपास 100 टक्के आहे. दुर्देवी बाब म्हणजे राखीव दिवशीही पाऊस होण्याचा अंदाज हा 95 टक्के आहे. याबाबतचं वृत्त इएसपीएनने हवाामान खात्याच्या हवाल्याने दिलं आहे.  

टीम इंग्लंड : जॉस बटलर (कॅप्टन), मोईन अली, एलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, फिल साल्ट, बेन स्टोक्स, टायमल मिल्स, डेविड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड.

टीम पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, हैदर अली, आसिफ अली, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, शाहीन शाह आफरीदी आणि शान मसूद.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *