Headlines

स्वरा भास्करनं बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला व्हिडीओ, प्रेग्नंसी ग्लोनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

[ad_1]

Swara Bhaskar : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात फहाद अहमद यांच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या बातमीनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. स्वरानं लग्नाच्या पाच महिन्यांनंतर प्रेग्नंसीविषयी घोषणा केली होती. आता स्वरानं बेबी बंप दाखवताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

स्वरानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत स्वरानं मॅटर्निटी क्लोथ्स परिधान केले आहे. स्वरा यावेळी हे कपडे दाखवताना दिसत आहे. व्हिडीओत स्वराचा नो मेकअप लूक दिसून येत आहे. स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट देखील केल्या आहेत. 

स्वराच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘बाळासाठी शुभेच्छा आणि आता सगळे अंध भक्त मामा झाले आहेत.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही खूप चांगली बातमी असून त्याला मी रिलेट करू शकते कारण मी देखील 33 आठवड्यांची प्रेग्नंट आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘वाघिणीच्या गर्भातून वाघाचा जन्म होईल.’ आणखी एक म्हणाला, ‘तो ड्रेस खूप सुंदर दिसतोय… तू आनंदी आहेस.’ एका नेटकऱ्यांनी स्वराला शुभेच्छा देत सांगितले की ‘तू सुंदर दिसते. आई होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.’ एक नेटकरी म्हणाला, ‘तुझ्या चेहऱ्यावर असलेला ग्लो मला आवडला.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अब्दुलचा जन्म लवकरच होणार.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रेग्नंसीमध्ये तू खूप गोंडस आणि हेल्दी दिसतेस.’ 

स्वरा आणि फहाद अहमद यांच्या विषयी बोलायचे झाले तर यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचे लग्न झाले. त्या आधी स्वरानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत फहादची एक झलक शेअर केली होती. पण त्यावेळी स्वरानं त्याचा चेहरा दाखवला नव्हता. त्यानंतर अचानक त्यांनी रजिस्टर मॅरेज करत त्यांच्या लग्नाचा खुलासा केला. फहाद हे समाजवादी पार्टीचा युवा नेता आहेत. तर आता ते महाराष्ट्र आणि मुंबईच्या समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहेत. 

हेही वाचा : Bigg Boss OTT मध्ये पूजा भट्टचा मोठा खुलासा, इतक्या वर्षांनी सांगितलं ‘ते’ सिक्रेट

स्वराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर स्वराला ‘निल बटे सन्नाटा’, ‘तनु वेड्स मनु’ और ‘रांझणा’ या चित्रपटांसाठी प्रेक्षक ओळखतात. तिला सगळ्यात शेवटी 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जहां चार यार’ या चित्रपटाच्या स्क्रिनवर पाहिलं होतं. तर आता स्वरा ही तिचा आगामी चित्रपट ‘मिसेज फलानी’ च्या प्रदर्शनाची प्रतिक्षा करत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *