Headlines

K Pop प्रसिद्ध गायिका हेसूचा हॉटेलमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह, चाहत्यांना धक्का

[ad_1]

K Pop Singer Haesoo Dies at the Age of 29: के – पॉपचं विश्व आता सगळीकडेच वाढत जात आहे. या पॉप कल्चरचे जगभरात अनेक फॅन्स आहेत त्याचसोबत भारतातही या के-पॉपचा मोठा चाहता (Shocking News) वर्ग आहे. परंतु याच लोकप्रिय के-पॉप विश्वातून एक खळबळजनक बातमी येते आहे. के-पॉप गायिका हेसू हिचे वयाच्या 29 व्या वर्षी निधन झाले असून तिचा मृत्यू आत्महत्येनं (K Pop Singer Haesoo Dies by Suicide) झाले असल्याचे कळते आहे. तिची सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात आली आहे.

एका हॉटेलमध्ये तिचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला आहे. या बातमीनं तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. काही दिवसांपुर्वी के-पॉप स्टार गायक मूनबिन यानं आत्महत्या गेल्याचे वृत्त समोर आले आहे. (K Pop Singer Haesoo Dies at the Age of 29 entertainment news in marathi)

ही घटना ताजी असताना आता समोर आलेल्या या बातमी के-पॉप विश्वातील चाहत्यांना धक्का बसला आहे. के-पॉप हे गेल्या काही दशकांपासून प्रचंड लोकप्रिय ठरलं आहे. भारतातील तरूण मंडळीही के-पॉपचे चाहते आहेत. त्यांच्या शोजना प्रचंड गर्दी होताना दिसते. जगभरातील प्रेक्षक त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टना (K Pop Popularity in India) येताना दिसतात.

हेही वाचा – ”… यासाठी मी देवाचे आभार मानते”, लेकीच्या साखरपुड्यानंतर Parineeti Chopra च्या आईची पोस्ट चर्चेत

सध्या या दोन घटनांनी संगीत विश्व हादरून गेले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तिच्या मृत्यूपुर्वी तिचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ती कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकली नव्हती. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. 15 मे रोजी YTN या साऊथ कोरियन न्यूज आऊटलेटनं तिच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले. 

पोलिसांचा तपास सुरू 

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार असेही कळते की, 13 मे रोजी तिचा मृतदेह पोलिसांना एका हॉटेल रूममध्ये आढळून आला आहे. तिनं सुसाईड नोट लिहिल्यानं तिनं आत्महत्या केल्याचे कळते आहे परंतु याबद्दल पोलिस अजूनही तपास घेत आहेत. इतक्या लहान वयात तिनं आत्महत्या का केली हे मात्र काही कळले नाही. 

कोण होती 29 वर्षीय हेसू? 

हेसू हिचा जन्म 1993 साली झाला आहे. 2019 साली तिनं आपल्या करिअरला (Who is Haesoo) सुरूवात केली होती. ‘My Life, Me’असं तिच्या पहिल्यावहिल्या अल्बमचे टायटल होते. त्यानंतर तिचा ‘The Tort Show’ हा अल्बम आला होता. या अल्बममुळे तिच्या लोकप्रियेतत बरीच वाढ झाली होती. तिच्या मृत्यूनं जगभरातून शोक व्यक्त केला जातो आहे. तिचे सोशल मीडियावरही खूप मोठे फॅन फॉलोईंग होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *