Headlines

Sushma Andharen responded to Gula Rao Patal for calling NCP parcel msr 87

[ad_1]

राज्यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. सध्या ही यात्रा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात आहे. या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं दिसत आहे. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंना राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘पार्सल’ असं म्हटल्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी गुलाबरावांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा – “ज्यांना सत्तेत असुनही आपला पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी…”; खैरेंच्या दाव्यावर पटोलेंकडून प्रत्युत्तर

सुषमा अंधारे म्हणाल्या, “गुलाबराव पाटलांची सध्या प्रचंड धांदल उडालेली आहे. ते गोंधळून गेले आहेत. त्यांना काय बोलावं हे सूचत नाही. अगोदर ते मला तीन महिन्यांचं बाळ म्हणाले होते. जर तीन महिन्याचं बाळ म्हणत असाल तर मग या तीन महिन्याच्या बाळाला मारून, कुटून गप्प बसवा ना. त्याच्यासाठी ५०० पोलीस कशासाठी वापरताय? आता ते म्हणत आहेत की हे राष्ट्रवादीचं पार्सल आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसची साधी प्राथमिक सदस्यही नव्हते. माझं खुलं आव्हान आहे कोणीही माहिती अधिकाराखाली ही माहिती काढावी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून माहिती घ्यावी किंवा अन्य कुठूनही माहिती घ्यावी माझा कधीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला नाही.” एबीपी माझाशी त्या बोलत होत्या.

हेही वाचा – सिल्लोडची सभा रद्द झाल्याने ‘रणछोडदास’ म्हणत आदित्य ठाकरेंवर नरेश म्हस्केंनी साधला निशाणा

याशिवाय, “एकमेव हल्लाबोल यात्रा जी परळीत झाली होती, त्या यात्रेत सुद्धा माझं वाक्य आहे की मी राजकारणातील मुलगी नाही. गणराज्य संघ ही एक महाविकास आघाडीशी जुडलेली संघटना होती, आमचा छोटा जीव आहे. आमचा एकही उमेदवार निवडणुकीत नव्हता, त्यामुळे स्वाभाविक आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसभा केल्या.” असंही सुषमा अंधारेंनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा – …पण मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन ; आम्ही करेक्ट कार्यक्रम केला – देवेंद्र फडणवीसांचं विधान!

याचबरोबर “तर मुद्दा हा आहे की गुलाबराव पाटील जर तुमच्या भाषेत सांगायचं असेल की मी राष्ट्रवादीचं पार्सल आहे, शिवसेनेला घातक आहे तर मग तुम्ही मला सक्रीय ठेवलं पाहिजे. कारण, तुम्हाला शिवसेना संपवायचीच आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही शिवसेना संपवायचीच आहे. मग तुम्ही मला सक्रीय कसं काय ठेवत नाही. उलट तुम्ही तर मला प्रत्येक ठिकाणी जायबंदी करत आहात. मला प्रत्येक ठिकाणी तुम्ही अडवत आहात. याचा अर्थ असा आहे की शिवसेनचा घाव तुमच्या वर्मी बसलेला आहे. शिवसेना राईट ट्रॅकवर आहे आणि आम्ही गलितगात्र न होता ज्या उर्जेने लढत आहोत. तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही लढतो आहोत, हे कुठंतरी त्यांच्या जिव्हारी लागलेलं आहे.” असं म्हणत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *