Headlines

“सरन्यायाधीशांची ओळख होती म्हटलं की..,” उदय लळीत यांच्या सत्कार समारंभात फडणवीसांचे विधान! | devendra fadnavis said i know cji uday lalit from 2000 criticize opposition

[ad_1]

महाराष्ट्राचे सुपुत्र उदय उमेश लळीत यांनी ऑगस्ट महिन्यात सरन्यायाधीशपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ७४ दिवसांच्या कार्यकाळानंतर ८ नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (५ नोव्हेंबर) राजभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच सरन्यायाधीशांशी ओळख आहे, असं म्हटलं की लोक टीका करतात. मात्र मी सरन्यायाधीश लळीत यांना २००० सालापासून ओळखतो, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> “तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात? आमच्यासारखं अचानक की…”; शिंदे हसून म्हणाले, “मी जी हिंमत…”

“उदय लळीत यांचा सत्त्कार यापूर्वीच करायचा होता. मात्र इंग्लंडच्या महाराणींचे निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम लांबला. अलीकडच्या काळात वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. सरन्यायाधीशांची कधीतरी ओळख होती, असे सांगितले की काही लोक टीका करतात. मात्र २००० साली सर्वोच्च न्यायालयात महानगरपालिकेचा एक खटला होता. तेव्हा सरन्यायाधीश उदय लळीत हे आमचे वकील होते. सर्वोच्च न्यायालयाजवळ असलेल्या सरांच्या फ्लॅटवर आम्ही बसायचो. त्यांच्या फ्लॅटवर जाताना आम्ही लिफ्टचा वापर करायचो, ते मात्र पायऱ्यांनी वर जायचे. त्यांची प्रकृती उत्तम असण्यामागे हेच कारण असावे,” असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> ज्यांना सत्तेत असुनही आपला पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी…”; खैरेंच्या दाव्यावर पटोलेंकडून प्रत्युत्तर

दिल्लीमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालयात त्यांनी उत्तम वकिली केली. त्या काळात सुप्रिम कोर्टातील अभ्यासू आणि ज्ञानी वकील म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी न्यायदानाचे काम केले. ते फार नम्र आहेत. त्यांनी वकील म्हणून उत्तम काम केले. तसेच सरन्यायाधीशपदी विराजमान झाले, तरी त्यांच्यातील नम्रता अद्याप कायम आहे, असे कौतुकोद्गार फडणवीस यांनी काढले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *