Headlines

Suryakumar Yadav : मुंबईकर सूर्यकुमारचा ‘वरचा क्लास’, आयसीसी रँकिंगमधील धमाका सुरुच

[ad_1]

मुंबई : आयसीसीने टी 20 रँकिंग (Icc T 20 Ranking) जारी केली आहे. यामध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या (Team India) सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) बोलबाला पाहायला मिळाला आहे. सूर्यकुमारने आपलं अव्वल स्थान कायम राखंलंय. पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत सूर्याच्या आसपास कुणीही नाही. सूर्यकुमारने टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) धमाकेदार कामगिरी करत पहिलं स्थान मिळवलं होतं. सूर्याने टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 मधील 5 सामन्यात 3 अर्धशतकं ठोकली होती. (team india suryakumar yadav is retained his top 1 position in icc t 20 batting ranking)

सूर्याला वर्ल्ड कपमधील कामगिरीमुळे करियरमधील सर्वोत्तम 869 रेटिंग्स पॉइंट्स मिळाले होते. मात्र सूर्या इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये 10 धावांवर आऊट झाला होता. त्यामुळे सूर्याला 10 रेटिंग्स पॉइंट्सने नुकसान झालं. मात्र त्यानंतरही सूर्याने 859 पॉइंट्ससह सिंहासन कायम राखलंय.

टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरी

सूर्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 189.68 च्या कडक स्ट्राईक रेटने 239 धावा कुटल्या होत्या. सूर्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. 

सूर्या व्यतिरिक्त रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही. विराट कोहली (Virat Kohli) 11 व्या स्थानी आहे. तर लोकेश राहुल (K L Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुक्रमे 17 आणि 18 व्या क्रमांकावर विराजमान आहेत.

बॉलर्समध्ये पहिला कोण? 

गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा (Wanindu Hasranga) पहिल्या क्रमांकावर आहे. वानिंदुच्या नावावर 704 रेटिंग्स पॉइंट्स आहे. तर या यादीत टीम इंडियाचा भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) हा 14 व्या स्थानी आहे. 

तर ऑलराउंडर्समध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) तिसऱ्या स्थानी आहे. पंड्याकडे ताज्या आकडेवारीनुसार  203 पॉइंट्स आहेत. तर अव्वल स्थानी बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आहे. 

दरम्यान टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला (India Tour Of New Zealand 2022) 18 नोव्हेंबरपासून सुरुवात आहे. या दौऱ्यात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टी  20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे.

संबंधित बातम्या 

India Tour New Zealand 2022 : टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज, पहा संपूर्ण शेड्यूल

IND vs NZ : टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघाची घोषणा



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *