Headlines

Surya Grahan: दिवाळी दरम्यान सूर्यग्रहण या 5 राशींच्या लोकांवर संकट

[ad_1]

Diwali 2022 : भारतातील सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali) काही दिवसांवर आला आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे. मात्र, दिवाळीला होणारे सूर्यग्रहण (Surya grahan) ऐकून अनेकजण नाराज झाले आहेत. दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला (Kartik Amavasya) साजरा केला जातो आणि यावर्षी कार्तिक अमावस्येला सूर्यग्रहण होणार आहे. पण अमावस्या तिथी 24 आणि 25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी असेल. 24 तारखेच्या रात्री दिवाळी साजरी होणार असून 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी सूर्यग्रहण होणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबरला देव दिवाळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. अशा परिस्थितीत, सणांच्या दरम्यान पडणारी ही दोन ग्रहणे पाच राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकतात, असा ज्योतिषांचा दावा आहे.

वृषभ – सणासुदीच्या काळात येणारे सूर्य आणि चंद्रग्रहण वृषभ राशीच्या लोकांसाठी अजिबात शुभ मानले जात नाही. वृषभ राशीच्या लोकांनी सूर्य आणि चंद्रग्रहण दरम्यान सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्याच्या बाबतीत गाफील राहू नका. दोन्ही ग्रहणांच्या कालावधी दरम्यान कोणतेही नवीन कार्य सुरू करू नका.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांनाही सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या काळात काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान तुम्हाला नशिबाची साथ अजिबात मिळणार नाही. विविध कामांमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. उत्पन्नापेक्षा खर्चात वाढ होईल. तणावही वाढू शकतो. पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.

कन्या – या राशीच्या लोकांनाही काळजी घ्यावी लागेल. कन्या राशीचा अनावश्यक खर्च वाढू शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते काही काळासाठी पुढे ढकला. या काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. या काळात क्रेडिटचे व्यवहार करू नका.

तूळ – सूर्यग्रहणापासून चंद्रग्रहणापर्यंत तूळ राशीच्या लोकांनाही सावध राहावे लागेल. तुमचा पैसा कमी होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या लोकांनाही ग्रहण काळात सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत त्रास होऊ शकतो. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करा. उधारीचे व्यवहार टाळा. या काळात कोणतेही काम सुरू करण्याची योजना पुढे ढकलणे चांगले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *