Headlines

Surya Grahan 2023: वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींना फळणार; पैसा, करिअर सर्व बाबतीत चांदी होणार

[ad_1]

Solar Eclipse 2023:  नव्या वर्षाची सुरुवात होऊन आता नवा महिनाही सुरु झाला आहे. वर्षाचा पहिला महिना नेमका कसा सरला याचीच अनेकांना कल्पनाही आली नाही. हा राहिला मोठ्या चर्चेचा मुद्दा. याच वर्षातील पहिलं सूर्यग्रहणही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. 2023 या वर्षातील पहिलं ग्रहण एप्रिल महिन्यामध्ये असणाऱ आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यास ही परिस्थिती उदभवते. यामध्ये सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत थेट पोहोचू शकत नाहीत. एकिकडे ही माहिती समोर आलेली असतानाच दुसरीकडे ग्रहणाचं ज्योतिषविद्येच्या अनुषंगानं असणारं महत्त्वंच लक्ष वेधताना दिसत आहे. (surya grahan 2023 effects and significance sutak kal )

ज्योतिषामध्ये (Astrology) देण्यात आलेल्या माहितीनुसार ग्रहण कायम अमावस्येला लागतं. यंदाच्या वर्षी 20 एप्रिल 2023 ला हे ग्रहण असणार आहे. सकाळी 7 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत हा ग्रहणकाळ असेल. यादरम्यान पूजाअर्चा करण्यावर विशेष भर असणार आहे. 

ग्रहण कुठून दिसेल? 

हिंदू पंचांगानुसार (Panchang) सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिलला लागेल. असं असलंतली हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. ज्यामुळं त्याचा सूतक काळही मान्य नसेल. हे ग्रहण कंकणाकृती असणार आहे. यावेळी सूर्याची उच्च रास मेष असणार आहे. तर, अश्विनी केतु असं नक्षत्र असेल. ज्यामुळं ग्रहणाचा तीव्र प्रभाव पडू शकेल. 

वर्षातलं हे पहिलं सूर्यग्रहण माइक्रोनेशिया, दक्षिण पॅसिफिक सागर, तिमोर, न्यूजीलंड, मलेशिया, फिजी, सिंगापुर, थाईलंड, अंटार्क्टिका, जपान, समोआ, सोलोमन, बरूनी, कंबोडिया, चीन, अमेरिका, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपींस, ऑस्ट्रेलिया, विएतनाम, तैवान, दक्षिण हिंद महासागर भागात दिसेल. 

कोणत्या राशीवर होणार सर्वाधिक परिणाम? 

वर्षातल्या पहिल्याच सूर्यग्रहणाचे थेट परिणाम मेष राशीच्या व्यक्तींवर परिणाम करताना दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या जातकांना आर्थिक लाभ होणार आहे. करिअरपासून इतर सर्वच क्षेत्रांत त्यांना प्रगतीची संधी आहे. इतकंच नव्हे, तर खासगी आयुष्यातही सकारात्मक बदल होणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *