Headlines

Surya Gochar : उद्या सर्वात मोठे ग्रह गोचर, महिनाभर या राशींचे भाग्य उजळणार!

[ad_1]

Shani Surya Yuti in Kumbh February 2023: उद्याचा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा आहे. (Shani Surya Yuti ) कारण त्यांचा भोग्यदयोग उद्यापासून होणार आहे. कारण ज्योतिष शास्त्रात, सूर्याच्या राशीचा बदल अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. उद्या, 13 फेब्रुवारी 2023 रोजी, सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. शनी आणि सूर्याच्या संयोगाने काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. (Surya Gochar)

ज्योतिष शास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य दर महिन्याला राशी बदलतो आणि त्याला गोचर म्हणतात. उद्या, 13 फेब्रुवारी 2023 रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, याला कुंभ गोरच म्हणतात. सूर्याचा हा राशिचक्र बदल खूप खास आहे कारण सूर्य शनी आणि कुंभ राशीत गोचर करणार आहे. ज्यामध्ये शनी आधीपासूनच आहे. अशा प्रकारे कुंभ राशीमध्ये शनी आणि सूर्याचा गोचर होईल. 14 मार्च 2023 पर्यंत सूर्य कुंभ राशीत राहील. त्यामुळे सूर्य आणि शनीचा हा संयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पाडेल आणि काही लोकांचे भाग्य उजळणार आहे.

सूर्य गोचर 2023 वेळ आणि प्रभाव

सूर्य 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.57 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. या गोचरचा सर्वात शुभ प्रभाव 4 राशींच्या लोकांवर होणार आहे. त्यामुळे त्यांचे भाग्य उजळणार आहे.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर खूप शुभ संकेत देत आहे. या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. समाजात मानसन्मान मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

कन्या – सूर्य राशीतील बदलाचा चांगला प्रभाव कन्या राशीच्या लोकांवरही होईल. या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. व्यवसाय वाढेल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. विरोधक तुमचे काहीही करु शकणार नाहीत. उलट त्यांचा पराभव होईल.

कुंभ – रवी गोचरानंतरच कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे कुंभ राशीमध्ये शनी आणि सूर्याचा संयोग तयार होईल, जो या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. या लोकांचे व्यक्तिमत्व चांगले खुलण्यास मदत होणार आहे. भागीदारीचे काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. 

धनु – 13 जानेवारीला सूर्याचे कुंभ राशीत होणारे संक्रमण धनु राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. हे लोक नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरु करु शकतात. वडिलांचे सहकार्य मिळेल. धनलाभ होईल. रोज सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने प्रत्येक कामात यश मिळेल. 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आणि माहितीवर आहे. ZEE 24 TAAs त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *