Headlines

सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन कानफाटात…” | kishori pednekar criticizes abdul sattar for derogatory comments on supriya sule

[ad_1]

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. या टिप्पणीमुळे सत्तार यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. तसेच सत्तार जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, सत्तार यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर आपले वलय निर्माण केले आहे. सत्तार बेगडी हिंदूत्व घेऊन अशी वक्तव्य करत आहेत, असे पेडणेकर म्हणाल्या. त्या आज (८ नोव्हेंबर) सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

हेही वाचा >> हर हर महादेव चित्रपट विरोध : जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

“सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवून स्वत:चे वलय निर्माण केले आहे. त्यांनी मतदारांशी प्रामाणिकपणा ठेवलेला आहे. सुप्रिया सुळे या आदर्श घेण्यासारख्या आहेत. त्यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. सत्तार बेगडी हिंदुत्व घेऊन महाराष्ट्रात नाचत आहेत. ते मंत्री आहेत. मात्र ज्या शब्दाचा उच्चार केला जाऊ शकत नाही, असा शब्द त्यांनी वापरला आहे. दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर, हे योग्य नाही,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंवरील शिवीगाळ प्रकरणावर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण, म्हणाले “जरूर खेद व्यक्त करेन, परंतु…”

शिंदे गटातील नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केला होता. त्यावरदेखील पेडणेकर यांनी भाष्य केले. “गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत. त्यांना सुषमा अंधारे कोणत्या दृष्टीने नटी वाटल्या. तुमच्या घरातील स्त्रियांनादेखील गुलाबराव असेच म्हणतात का. अंधारे पक्षात येऊन त्यांची भूमिका मांडत आहेत. त्या भूमिकांचा त्रास होतोय, म्हणून त्यांना नटी वगैरे म्हटले जात आहे,” अशी घणाघाती टीका पेडणेकर यांनी केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *