Headlines

न्यायालयाच्या निर्णयानंतर सुनिल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “संजय राऊतांनी ठरवलंय की…” | sunil raut said sanjay raut may out from custody in next hearing

[ad_1]

कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाच्या ( ईडी ) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आगामी २ नोव्हेंबरपर्यंत ते कोठडीतच असतील. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांचे बंधू तथा शिवसेनेचे नेते सुनिल राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २ नोव्हेंबर रोजी त्यांना जामीन मिळेल अशी आशा आहे, असे सुनिल राऊत म्हणाले आहेत. तसेच जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत मी माध्यमांशी बोलणार नाही, असे संजय राऊत यांनी ठरवले आहे, अशी माहितीही सुनिल राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा >> एलॉन मस्क आल्यावर खरंच ७५ टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार? ट्विटरने दिलं स्पष्टीकरण

“मागील वेळी संजय राऊत यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र माध्यमांनी राऊत यांच्या तोंडी काही शब्द घातले. दुसरीकडे न्यायालयाने हा राजकीय खटला नसून राऊत यांनी प्रतिक्रिया दिली तर त्यात काही गैर नाही, असे न्यायालयाने सांगितलेले आहे. ईडीला याबाबतीत काही आक्षेप आहे का? असे न्यायालयाने विचारले होते. जोपर्यंत मी जामिनावर बाहेर येणार नाही, तोपर्यंत मी मीडियाशी चर्चा करणार नाही, असे संजय राऊत यांनी ठरवलेले आहे,” अशी माहिती सुनिल राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरे, भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान

“संजय राऊत हे महाराष्ट्राचे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. राऊत यांना का अटक केली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. याच कारणामुळे त्यांच्याप्रती महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात सहानुभूती आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक राऊत यांना भेटण्याासाठी उत्सुक आहे. जेव्हा तारीख असते तेव्हा न्यायालय परिसरात गर्दी जमते. ते स्वाभाविकही आहे. गर्दी होत असेल तर ती आटोक्यात आणण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असे न्यायालयाने सांगितलेले आहे,” असे सुनिल राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा >> “टिळक म्हणाले होते सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आता..”, अरविंद सावंतांचं सत्ताधाऱ्यांवर टीकास्र!

“आगामी २ तारखेला संजय राऊत यांना जामीन मिळेल, असे मला वाटते. ईडीच्या वकिलांनी त्यांचे लेखी मत न्यायालयासमोर सादर केल्यानंतर राऊतांना जामीन मिळू शकतो. आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. आगामी २ तारखेला ईडीदेखील आपले म्हणणे मांडेल, अशी अपेक्षा आहे. संजय राऊत लवकरात लवकर बाहेर यावेत, अशी प्रत्येकाची इच्छा आहे,” असे सुनिल राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “आत्तापर्यंत सगळे दबून बसले होते, मात्र आता…” मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी, म्हणाले, “मनात इच्छा असतानाही…”

संजय राऊत यांची दिवाळी कोठडीतच

गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज ( २१ ऑक्टोंबर ) सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत २ नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *