Headlines

Subhash wankhedes-sensational-statement-about-hemant-patil-and-aanand-jadhav | Loksatta

[ad_1]

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे माजी खासदार सुभाष वानखेडें यांनी घरवापसी करत शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वानखेडेंनी हेमंत पाटील आणि आनंद जाधवांबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा-

हेमंत पाटील आणि आनंद जाधव यांनी अशोक चव्हाणांना शिवसेना विकली

“शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. जाधव हे शिंदे गटात जाणारच होते. खूप दिवसांपासून त्यांच हे चाललं होतं. खासदार हेमंत पाटील आणि संपर्क प्रमुख आनंद जाधव या दोघांनी नांदेड जिल्ह्यामधील शिवसेना अशोक चव्हाणांना विकली” असल्याचे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

हेमंत पाटील आणि आनंद जाधव शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात सामील झाले. पाटील यांच्या बंडखोरीनंतर हिंगोलीत मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी निर्दशने केली होती. हेमंत पाटलांच्या पावलावर पाऊल टाकत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी आनंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. जाधव यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.

सुभाष वानखेडेंची घरवापसी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हिंगोली लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर वानखेडेंनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर २०१९ साली वानखेडेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत हिंगोली लोकसभेसाठी रिंगणात उतरले होते. मात्र, त्यावेळेस शिवसेनेच्या हेमंत पाटील यांचा विजय झाला. आता वानखेडे यांनी पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. वानखेडे यांच्या शिवसेना प्रवेशाने नांदेड जिल्ह्यासह हिंगोली लोकसभेची राजकीय समीकरणे बदलणार आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *