Headlines

subhas desai statement on state government support to balasaheb thackeray monument spb 94

[ad_1]

शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात राज्य शासनातर्फे बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारले जात आहे. हे स्मारक नेमके कसे असेल याबाबतचे सादरीकरण बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतर्फे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. दरम्यान, या स्मारकाला राज्य शासनातर्फे काही मदत मिळते आहे का? याबाबत प्रश्न विचारला असता, शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – कधीही न पाहिलेले फोटो, कार्टुन्स अन् बरंच काही, बाळासाहेबांचं जीवनपट उलगडणारं मुंबईतील स्मारक नेमकं कसं असेल?

काय म्हणाले सुभाष देसाई?

या स्मारकाच्या कामासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य आहे. किंबहूना या स्मारक उभारण्याची संपूर्ण संकल्पाना राज्य शासनातर्फे अंमलात येत आहे. तसेच या स्मारकासाठी लागणारा निधी मंजूर झालेला आहे. ही जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली आहे. पुढची प्रक्रिया एमएमडीएकडून सुरू आहे. जे वेळापत्रक ठरवण्यात आलं आहे. त्याप्रमाणे ही कामं सुरू आहेत. पहिला बांधकामाचा टप्पा एप्रिल-मे महिन्यात पूर्ण होणार आहे. तसेच या स्मारकाचे काम २०२३च्या शेवटपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या स्मारकासाठी सर्व परवानगी मिळाल्या असून सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

हेही वाचा – “राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा उद्धव ठाकरेंचा अंदाज, गुजरातमध्ये…”; अरविंद सावंतांचं विधान

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेकजण मला विचारतात की इथे पुतळा कुठे असेल. मी त्यांना सांगतो की येथे पुतळाच नसेल. पुतळा म्हणजे स्मारक नाही. बाळासाहेबांचे फोटो आणून लावले. त्यांनी काढलेले कार्टून आणून ठेवले, त्यांच्या वस्तू आणून ठेवल्या म्हणजे संग्रहालय होतं. हे संग्रहालय म्हणजे स्फूर्तीस्थान असणार आहे. हे संग्रहालय म्हणजे प्रेरणा देणारे स्थान असणारे आहे”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *