Headlines

राज्यात वर्षभरात ‘वयोश्री’च्या लाभार्थी संख्येत १२ पटींनी वाढ

[ad_1]

चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : केंद्र सरकारमार्फत दारिद्रय़रेषेखालील नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा भाजपला निवडणुकीत फायदा होत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या वृद्ध व अपंगांसाठीच्या राष्ट्रीय ‘वयोश्री’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका वर्षांत बारा पटीने वाढ नोंदवली गेली आहे.

राज्यात महापालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. २०२०-२१ मध्ये राज्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या फक्त ३४३४ होती. एकाच वर्षांत २०२१-२२ मध्ये ही संख्या ४१,२८२ म्हणजे १२ पट वाढली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ३१२६ व २०१८-१९ मध्ये ३२१७ होती. त्यानंतर २०२०-२१ मध्ये त्यात विशेष वाढ झाली नाही. या वर्षी ही संख्या ३४३४ होती. म्हणजे २०१७ ते २०२१ या दरम्यान लाभार्थ्यांच्या संख्येत जुजबी वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र त्यानंतर २०२२ मध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत १२ पटींहून अधिक वाढ होत ती ४१,२८२ इतकी झाली.

नागपुरात भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेच्या अंमलबजावणीवर अधिक लक्ष केंद्रित केले. वॉर्डावॉर्डात शिबिरे आयोजित केली. शहरात २८ हजार तर जिल्ह्यात ८ हजार असे एकूण ३६ हजार लाभार्थ्यांची नोंदणी एकटय़ा नागपूर जिल्ह्यात झाली असून त्यांना सरासरी ३४.८३ कोटींचे उपकरण वाटप करण्यात येणार आहे. त्याची सुरुवातही झाली आहे.

अशी आहे योजना

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने १ एप्रिल २०१७ पासून राष्ट्रीय वयोश्री योजना (आरव्हीवाय) योजना दारिद्रय़रेषेखालील ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी सुरू केली होती. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व अपंगांना काठी, चालण्यासाठी वॉकर, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, चष्मा आदी उपकरणे नि:शुल्क वाटप केली जातात. लाभार्थ्यांची निवड आरोग्य शिबीर किंवा तत्सम शिबीर आयोजित करून त्यांची तपासणी करून गरजेनुसार त्याचे वाटप समूहानेच केले जाते. विशेष म्हणजे राज्य सरकारचाही यात सहभाग असतो.

वयोश्रीची सध्याची स्थिती

वर्ष           महाराष्ट्र        देश

२०२०-२१       ३४३४         २३.१३३

२०२१-२२       ४१,२८२        ७०,६७१

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *