Headlines

राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, शिंदे गटातील कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? वाचा… | Know which minister of Shivsena rebel Eknath Shinde group get which ministry in Shinde Fadnavis government pbs 91

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

शिंदे गटातील मंत्र्यांकडे कोणती खाती?

एकनाथ शिंदे – मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे – बंदरे व खनिकर्म

संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे – कामगार

संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत – उद्योग

तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार – कृषी

दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा

शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *