Headlines

स्टार खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

[ad_1]

मुंबई : स्टार खेळाडू जितके प्रसिद्ध होत असतात, तितकेच त्याची बदनामी देखील अनेक प्रकरणात होत असते. असे प्रकार प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत घडत नाहीत, तर क्वचितच अशा खेळाडूच्य़ा बाबतीत असे प्रकार घडत असतात. या प्रकरणात एका स्टार खेळाडूवर बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका मॉडेलने हा आरोप केला आहे. त्यामुळे बलात्काराचं नेमकं हे प्रकरण काय व हा खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात. 

फुटबॉल विश्नातली सर्वांत खळबळजनक बातमी आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (cristiano ronaldo) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पेशाने मॉडेल असलेल्या कॅथरीन मायोर्गा या महिलेने रोनाल्डोवर बलात्कार आरोप करत पुन्हा एकदा अमेरिकन कोर्टात धाव घेतली आहे.त्यामुळे रोनाल्डोच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

प्रकरण काय? 
रोनाल्डोवर (cristiano ronaldo) बलात्काराचा आरोप असलेले हे प्रकरण 13 वर्ष जून आहे. 2009 मध्ये लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा मॉडेलने केला आहे. यानंतर हे प्रकरण बराच काळ न्यायालयात चालले होते. अमेरिकेतील एका न्यायालयाने नुकतीच या प्रकरणात रोनाल्डोची (cristiano ronaldo)  निर्दोष मुक्तता देखील केली होती. 

निकाल काय ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डोच्या (cristiano ronaldo)  केसमध्ये अमेरिकन कोर्टाच्या न्यायाधीशांनी निकाल देताना आदेशात म्हटले आहे की, कॅथरीनच्या वकिलाने नियमांनुसार हा खटला लढलेला नाही. तक्रारी दाखल करण्याची प्रक्रियाही योग्य नाही. या कारणास्तव न्यायालयाने या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. कोर्टाने 2019 मध्ये सांगितले होते की, रोनाल्डोवर गुन्हा दाखल करता येणार नाही, कारण त्यात फक्त संशय असल्याचे त्यांनी नमुद केले होते. 

कोर्टात पुनर्याचिका 
दरम्यान आता मॉडेल कॅथरीनने पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. मॉडेलने बलात्काराचा आरोप करत रोनाल्डोकडून $375,000 नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यामुळे रोनाल्डो (cristiano ronaldo)  पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतो. 

दरम्यान मॉडेल कॅथरीन मेयोर्गा हीने पुन्हा याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर 23 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत रोनाल्डो (cristiano ronaldo)  दोषी आढळतो कि निर्दोष सुटतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *