Headlines

Sshort And Ssweet Trailer : एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट

[ad_1]

Sshort And Ssweet Trailer : वडील आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

आपल्या वडिलांना भेटण्याची तीव्र ओढ असतानाच एक अशी व्यक्ती वडिल म्हणून समोर येते, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अशा वेळी मुलाची झालेली अवस्था, वडिल म्हणून त्यांना स्वीकारताना मनात होत असलेली चलबिचल यात पाहायला मिळणार आहेत. त्याच्या आईने इतक्या वर्षांपासून वडिलांची ओळख का लपवून ठेवली आणि मुलगा कारण कळल्यानंतर वडिलांना स्वीकारणार का, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे. 

हेही वाचा : ‘मुन्नी’ खरंच बदनाम झाली; मलायकाचा विचित्र लूक पाहून नेटकरी म्हणतात, ‘ती उर्फी बरी’

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ‘या चित्रपटाची कथा नावाप्रमाणेच अतिशय स्वीट आहे. वडिल मुलाच्या नात्यात नेहमीच गुंतागुंत असते. परंतु काही गोष्टी मान्य केल्या, सुसंवाद साधला तर हे नाते नक्कीच चांगले होऊ शकते. हेच दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून यात धमालही आहे.’

या चित्रपटातील काही गाणी प्रदर्शित झाली होती. ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली होती. त्यापैकी एक म्हणजे ‘मन मतलबी’. या गाण्यात हर्षदचा कॅालेज हॅास्टेलपासून घरापर्यंतचा प्रवास या गाण्यात दिसत असून या दरम्यान त्याला अशा गोष्टी दिसत आहेत, ज्या त्याच्या मनाला अस्वस्थ करत आहेत. मनात त्याच्या काही द्वंद सुरू आहे. अतिशय श्रवणीय असे हे गाणे असून प्रत्येक शब्दात भावार्थ आहे. तर याच चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं असून 
‘काही म्हणा माझा गुन्हा’ हे गाणं देखील तितकंच व्हायरल झालं होतं. 

शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश कदम यांनी केले आहे. तर पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांची गोड कथा सांगणारा हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *