Headlines

श्रीदेवी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबात हे काय सुरुये? Photo मध्ये दिसले अनपेक्षित चेहरे

[ad_1]

Sridevi Family : बॉलिवूडची (Bollywood) ‘मिस हवाहवाई’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या निधनानं अनेकांनाच धक्का बसला होता. एकाएकी या अभिनेत्रीनं एक्झिट घेणं कुटुंबीयांनाही पचवणं कठीण होऊन बसलेलं. दिवस सरत गेले, मुली मोठ्या झाल्या. पती बोनी कपूर (Boni Kapoor) यांनीही पत्नीच्या निधनातून सावरण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांनी सावत्र आईच्या मुलींना म्हणजेच जान्हवी आणि खुशीलाही (Janhavi kapoor Khushi Kapoor) आपलंसं केलं. नात्यांची समीकरणंच बदलू लागली होती. आता श्रीदेवी यांची अनुपस्थिती कुटुंबीयांनीही स्वीकारलीये. सध्या या कुटुंबाचे खास क्षण पहताना हेच लक्षात येत आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या करवा चौथच्या निमित्तानं कपूर कुटुंबातील महिला आणि त्यांच्या बॉलिवूडमधील मैत्रीणी एकत्र जमल्या होत्या. यावेळी अनिल आणि सुनिता कपूर (Anil and Sunita Kapoor) यांनी घरी आलेल्या या खास पाहुण्यांचं स्वागत केलं. (Karwa Chauth 2022 Celebrated in the absence of sridevi at anil and Sunita Kapoors house watch photo and video)

अनिल कपूर यांचा भाऊ, संजय कपूरची (Sanjay Kapoor) पत्नी महिपही (Maheep Kapoor) यावेळी करवा चौथ सेलिब्रेशनसाठी इथं आली होती. या सेलिब्रिटी जाऊबाईंमध्ये फक्त श्रीदेवींचीच अनुपस्थिती होती. सोशल मीडियावर सुनिता यांनी या क्षणांचे फोटो शेअर केले, त्यामध्ये प्रेक्षकांच्या मनातला चेहरा मात्र कुठेच दिसला नाही. 

श्री त्यांच्या या खास मैत्रिणींसोबत उपस्थित नसल्या किंबहुना त्या कधीच परतणार नसल्या तरीही त्यांचं सर्वांच्या मनात असणारं स्थान मात्र अबाधित आहे हे नक्की. दरम्यान, करवा चौथच्या (Karwa Chauth celebration) या ग्रँड सेलिब्रेशनसाठी चंकी पांडेची पत्नी, भावना पांडे, अभिनेत्री रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, वरुण धवनची पत्नी नताशा यांनीसुद्धा हजेरी लावली होती. 

काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) पायांना दुखापत झाली होती. त्यामुळं ती या सोहळ्याला येणार का, हाच प्रश्न होता. पण, अखेर ती आली, तिनं पाहिलं आणि तिचीच चर्चा झाली. कपूर कुटुंबाच्या वतीनं दरवर्षी या दिवशी एक गेटटुगेदर आयोजित करण्यात येतं. यावेळी सेलिब्रिटींच्या पत्नींचे भन्नाट स्टाईल स्टेटमेंट पाहायला मिळतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *