Headlines

Sourav Ganguly : गांगुलीचं ठरलं! क्रिकेटनंतर ‘या’ क्षेत्रात ‘बॅटिंग’ करणार

[ad_1]

मुंबई : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) त्या एका ट्विटमुळे आजचा संपूर्ण दिवस गाजला. गांगुलीने नव्या इनिंगला सरुवात करतोय, अशा आशयाच्या ट्विटमुळे क्रीडा वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं. ‘दादा’च्या या ट्विटमुळे काही जणांचा गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असाही समज झाला. मात्र बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान गांगुलीने अखेर कोणत्या क्षेत्रात नव्या इनिंगला सुरुवात करतोय, हे जाहीर केलंय. (bcci chief sourav ganguly big announmcent he will launched a worldwide educational app)

गांगुलीने लोकांना फायदेशीर ठरेल, असं काही नवं करण्याचा माझा प्लॅन असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानुसारच गांगुलीने निर्णय घेतला आहे. 

गांगुलीने जगभरात नवीन एज्युकेशन अ‍ॅप लाँच करण्याचा जाहीर केलंय. एएनआयने याबाबतची माहिती दिलीय. स्वत: गांगुलीनेच आपल्या दुसऱ्या इनिंगबाबतची माहिती दिल्याने आता सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आणि बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष

दरम्यान गांगुलीने कॅप्टन असताना टीम इंडियाला खऱ्या अर्थाने लढायला आणि भिडायला शिकवलं. लॉर्ड्सच्या गॅलरीमध्ये हवेत फिरवलेली जर्सीचा तो क्षण आजही प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.

गांगुलीने क्रिकेटमधून रामराम ठोकल्यानंतर त्याने अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. त्याने बंगाल क्रिकेट बोर्डांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. यानंतर दादा 2019 मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाला.

यानंतर एका वर्षाने कोरोना आला. या आव्हानात्मक परिस्थितीत बीसीसीआय अध्यक्ष म्हणून त्याने अनेक स्पर्धांचं यशस्वीरित्या आयोजन केलं.

आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला. मात्र या परिस्थीतीत ही दादाने न डगमगता यूएईमध्ये सर्व खबरदारी घेत आयपीएलचं आयोजन केलं. दरम्यान गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा सप्टेंबप 2022 ला संपणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *