Headlines

मिटींगमध्ये असं काय घडलं की Sourav Ganguly चा पत्ता झाला कट?

[ad_1]

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार आहे. सौरव गांगुलीने ऑक्टोबर 2019 मध्ये बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारलं होतं. पुढील आठवड्यापर्यंत गांगुलीचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यानंतर आता गांगुलीच्या जागी रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. 18 ऑक्टोबरला बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान यावेळी गांगुली यांची हकालपट्टी केल्याची अनेक ठिकाणी चर्चा आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार आहेत. अशातच आता अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत की सौरव गांगुली यांची हकालपट्टी का झाली? या प्रकरणात नेमकं काय घडलं?

बीसीसीआयमध्ये 5 मोठी पदं

दरम्यान बीसीसीआयमध्ये 5 मोठी पदे आहेत. यानुसार,

1- अध्यक्ष

2-सचिव

3-ट्रेजरर

4-उपाध्यक्ष

5-सहसचिव

सध्याच्या पदांवर सौरव गांगुली अध्यक्ष आणि जय शाह सचिव होते. या सर्वांचा कार्यकाळ 3 वर्षांचा आहे. म्हणजे 3 वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्या लागतात.

बीसीसीआयच्या बाजूने निर्णय

सौरव गांगुली आणि टीम घटनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावेळी त्यांनी ती बदलण्याची मागणी केली. हा निर्णय बीसीसीआयच्या बाजूने आला. या निर्णायनुसार, बीसीसीआयमध्ये आता लोगापाठ दोन पदं घेता येतील. त्यानंतर बीसीसीआयमधील सर्व पदाधिकारी पुन्हा तेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कोणच्या कारणाने झाला गांगुलीचा पत्ता कट?

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये एक मोठी मिटींग झाली. यावेळी एन श्रीनिवासनने गांगुलीच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान तेव्हा कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची गोष्ट समोर आली. म्हणजे टीम इंडियाची स्पॉन्सर दुसरी कुठलीतरी कंपनी आहे आणि गांगुली कुठल्यातरी वेगळ्या कंपनीची जाहिरात करत होते. असे अनेक मुद्दे समोर आले आणि दादाचा पत्ता कट झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *