Headlines

एकांतात मलायकाचं हे चाललंय काय? Photo Viral

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा ही एकतर तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे किंवा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. काहीच नाही, तर ती तिच्या एखाद्या व्हिडीओमुळंही चर्चेत येते. अशी ही मलायका एरव्ही सत कामातच व्यग्र दिसते. (Bollywood Actress Malaika arora Goes Bold in red dress)

कामातून स्वत:साठी कधी वेळ काढायचा हे मात्र ती आवर्जून ठरवते. किंबहुना त्यासाठी तितकाच वेळही देते. काही दिवसांपूर्वीच आई आणि बहिणीसोबत हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये जाऊन आल्यानंतर आता मलायका आणखी एका नव्या ठिकाणी गेलीये. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकटीच दिसतेय. लाल रंगाचा असिमेट्रीक ड्रेस तिनं घातल्याचं इथं दिसत आहे. 

एकट्यानंच ती आसमंतात पाहताना दिसतेय, हे पाहून मलायकाचं नेमकं काय सुरुये अशा कमेंट काही चाहत्यांनी तिच्या फोटोवर केल्या. तर काहींनी तिच्या व्हॅकेशन लुकची प्रशंसा केली. 

बॉलिवूडची ही अभिनेत्री सध्या तुर्कीला गेली आहे. इथं ती सुट्टीचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. देश तसा वेश, हा मंत्र ती इथं फॉलो करताना दिसत आहे. टर्कीला जाताच तिनं काफ्तान आणि तत्सम आऊटफिट्सना पसंती दिली आहे. 

बरं, मलायका इथं फिरत असतानाच अर्जुन कुठंय ह प्रश्नही काही चाहत्यांनी विचारला आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन कपूर 2022 मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता त्या क्षणापासून या जोडीला सतत लग्नासंबंधीचेच प्रश्न विचारले जात आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *