Headlines

डोळे मिटल्यानंतरच Smita Patil यांची इच्छा पूर्ण; त्याने थरथरत्याने हाताने मेकअप केला आणि…

[ad_1]

Smita Patil Death Anniversary : कधी कोणाच्या वाट्याला सुखः आणि दुःख येईल हे सांगता येत नाही. आयुष्यात  आनंदाचे क्षण अनुभवत असताना अचानक एक वाईट बातमी कानावर येते आणि आयुष्यभराचं दुःख देवून जाते. असंच काही काही झालं आहे अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या सोबत. आज त्या आपल्याच नसल्या तरी त्यांच्या आठवणी आणि अभिनेत्रीचे चित्रपट आजही नवोदितांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. आज त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला, पण आजही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. (late actress Smita Patil last wish will make you cry)

‘ती’ ठरली स्मिता पाटील यांची अखेरची इच्छा… 

स्मिता पाटील अभिनेता राज कुमार यांच्यासोबत ‘गलियों का बादशाह’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होत्या. एके दिवशी जेव्हा त्या या अभिनेत्याला भेटण्यासाठी त्यांच्या मेकअप रुममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं, की तिथं त्यांचा मेकअप सुरु होता. (Smita Patil last wish)

दीपक सावंत हे मेकअप आर्टिस्ट तिथं स्मिता पाटील यांच्याही मेकअपची जबाबदारी सांभाळत होते. बस्स, तेव्हाच त्यांनी आपणही त्यांच्याकडून असाच निवांत झोपून मेकअप करुन घेऊ अशी इच्छा व्यक्त केली. (smita patil movies)

राज कुमार यांना पाहून तुम्ही असं काही ठरवू नका, असा सल्ला खुद्द सावंत यांनीच पाटील यांना दिला. तुम्ही बसूनच मेकअप करुन घ्या कारण, तेव्हाच तो व्यवस्थित करता येतो असं सांगताना राजकुमार यांची बात काही औरच असल्याचंही ते म्हणाले. (smita patil death picture)

वाचा | Rajpal Yadav वादाच्या भोवऱ्यात; विद्यार्थ्याकडून अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल 

 

पण स्मिता पाटील यांनी व्यक्त केलेली इच्छा त्यांची शेवटची इच्छा ठरेल हे देखील अभिनेत्रीला ठाऊक नव्हतं. 1986 साली स्मिता पाटील यांनी शेवटचा श्वास घेतला आणि दीपक यांनी अभिनेत्रीची शेवटची इच्छा पूर्ण केली. (smita patil best movies)

अभिनेत्रीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारांच्या आधी खुद्द सावंत यांनीच स्मिता पाटील यांना मेकअप करत थरथरत्या हातानं त्यांना एखाद्या नववधुप्रमाणं सजवलं होतं. स्मिता पाटील यांचं ते रुप आजही अनेकांच्या नजरेत कायम आहे. (smita patil father)

स्मिता पाटील यांनी अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला
‘भीगीन पालके’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची राज बब्बरशी भेट झाली. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रेमाचे चिन्ह प्रतीक बब्बर (smita patil son) हा मुलगा आहे, प्रसुतीदरम्यान अपघात झाल्यामुळे स्मिता पाटील यांनी अवघ्या ३१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. (smita patil death cause)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *