Headlines

स्मार्टफोनचे फुल स्टोरेज असे करा फ्री, या ट्रिक्स बनवतील तुमच्या स्मार्टफोनला सुपर फास्ट

[ad_1]

नवी दिल्ली: Smartphone Tricks: आजकाल प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये बरेच Apps इन्स्टॉल केलेले असतात. तसेच बराचसा डेटा फोनमध्येच सेव्ह असतो . फोटो ते व्हिडिओ, अनेक महत्त्वाच्या गोष्टी आता फोनमध्येच असतात. फोनच्या स्टोरेज आणि रॅमवर स्टफिंगचा काय परिणाम होईल याचा विचार न करता युजर्स सतत फोनमध्ये डेटा सेव्ह करतात ज्यामुळे फोन स्लो होतो. पण, काळजीचे कारण नाही. आज आम्ही काही भन्नाट टिप्स सांगणार आहो. ज्यांच्या मदतीने फोन फास्ट होईल आणि फोनमध्ये स्पेसही फ्री होईल. सर्वप्रथम फोनमध्ये अनावश्यक Apps Delete करा. हे Apps वापरात नसतात आणि ते अनेक महिने फोनमध्येच राहतात. ते फोनची जागाही व्यापतात.

वाचा: बजेट किमतीत OPPO Enco Buds2 लाँच, बड्स पाण्यात होणार नाही खराब, पाहा फीचर्स

ऑडिओ फाइल्स :

जवळपास प्रत्येकाच्या फोनमध्ये ऑडिओ फाइल्स असतात. या फाईल्स फोनचे स्टोरेज व्यापतात. तुम्ही या फायली कधीही ऐकत नाही किंवा त्या डिलीटही करत नाही, ज्यामुळे फोनचे स्टोरेज वाढते. अशा परिस्थितीत फोनमध्ये असलेल्या अशा फाईल्स डिलीट करणे महत्वाचे आहे. फोनमध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ सेव्ह असतात. या प्रकारचा डेटा फोनची जागा व्यापतो तुमच्या फोनमध्ये कोणताही फोटो किंवा व्हिडीओ निष्क्रिय असेल तर तो डिलीट करा. यामुळे फोनचे स्टोरेज मोकळे होईल.

वाचा: iPhone 14 बद्दल मोठी अपडेट! ‘या’ तारखेला होणार Apple इव्हेंट, iPhone 14 आणि Apple Watch करणार एन्ट्री

Google Photos :

तुम्हाला तुमचा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो हटवायचा नसेल आणि फोनची जागाही मोकळी करायची असेल, तर फोनचे फोटो आणि व्हिडिओ Google Photos वर सेव्ह करा. त्यानंतर तुम्ही फोनवरून तो डेटा डिलीट करू शकता.

व्हॉट्सअॅप स्टोरेज :

व्हॉट्सअॅप स्टोरेजकडे देखील लक्ष दिले पाहिजे. यासाठी तुम्हाला अॅपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर Storage and Data वर क्लिक करावे लागेल. यानंतर Manage Storage पर्याय निवडा. येथे तुम्हाला ५ MB पेक्षा मोठ्या फाइल्स डिलीट करण्याचा पर्याय मिळेल.

वाचा:Disney Plus Hotstar- Amazon Prime साठी वेगळे पैसे द्यायची नाही गरज, ‘असे’ मिळवा फ्री सब्स्क्रिप्शन

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *