Headlines

Smartphone Tricks: फोन स्लो झाला असेल तर अशी फ्री करा इंटर्नल मेमरी, फोन चालेल सुपरफास्ट, पाहा टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली:Internal Memory : स्मार्टफोनचा वापर आता मोठया प्रमाणात वाढला आहे. अशात, फोन वेळे आधीच स्लो झाल्याची तक्रार अनेक जण करतात. पण, यामागे नेमके कारण काय आहे याब्ब्दल अनेकांना फार माहित नसते. युजर्स ८ GB आणि १६ GB मेमरी पाहून फोन विकत घेतात. पण, काही दिवसातच मेमरी संपायला लागते आणि काही डाउनलोड किंवा इन्स्टॉल करायला गेल्यास फोन एरर देतो. काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमधून काही मिनिटांत बरीच मेमरी मोकळी करू शकता. तुमच्या फोनमध्ये अशी अनेक जुनी अॅप्लिकेशन्स असतात जी तुम्ही वापरत नसाल. अशात, ते अॅप्लिकेशन्स अनइंस्टॉल करा आणि जर तुम्ही वापरत नसलेले एखादे प्रीलोडेड अॅप असेल आणि ते अनइंस्टॉल होत नसेल. तर, सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप्सवर जा, ते अॅप निवडा आणि ते बंद करा.

वाचा: Flipkart sale : ऑफर्ससह १० हजारांच्या बजेटमध्ये घरी न्या हे ५ स्मार्टफोन्स, फोनमध्ये ६००० mAh बॅटरीसह ४ कॅमेरे

कॅशे मेमरी क्लियर करा :

कॅशे मेमरी फोनच्या इंटर्नल मेमरीमध्ये असते आणि ती हळू-हळू इतकी वाढते की ,त्याचा तुमच्या फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ लागतो. अशा स्थितीत तुम्ही फोनमधील उपलब्ध कॅशे मेमरी क्लिअर करून मेमरी स्पेसही वाढवू शकता. सेटिंग्जमधील स्टोरेजमध्ये कॅशे मेमरीचा पर्याय मिळेल.

वाचा: 5G इंटरनेट आल्यानंतरही स्पीड कमीच मिळणार, हे ४ कारणं स्पीड ब्रेकर ठरणार

फोटो आणि व्हिडिओ हटवा :

फोनची मेमरीअधिक फोटोमुळेही लवकर संपते. अशात तुम्ही तुमचे अनावश्यक फोटो फोनमधून डिलीट केले तर बरे. त्याचप्रमाणे फोनमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून येणारे व्हिडीओ आणि फोटोही खूप मेमरी घेतात. म्हणून ते देखील गरज नसल्यास डिलिट करा.

क्लाउड स्टोरेज वापरा :

क्लाउड स्टोरेज हे सर्वोत्तम माध्यम आहे. याद्वारे तुम्ही फोनमध्ये उपलब्ध असलेला सर्व डेटा क्लाउडवर साठवू शकता. जो तुम्ही नेहमी वापरत नाही. यामुळे फोनची मेमरी तर रिकामी होईलच. पण, फोन पूर्वीपेक्षा वेगवान होईल.

फॅक्टरी डेटा रीसेट आणि हार्ड रीसेट :

जर फोनची मेमरी पूर्ण संपली असेल तर तुम्ही फॅक्टरी डेटा रीसेट आणि हार्ड रीसेट करून बरीच मेमरी मोकळी करू शकता. पण लक्षात ठेवा की, हार्ड रीसेट आणि फॅक्टरी रीसेट करण्यापूर्वी फोनमध्ये उपलब्ध असलेल्या आवश्यक गोष्टींचा बॅकअप घेणे आवश्यक आहे.

वाचा: Paytm Users : फोन हरविला तरी पैसे राहतील सेफ, ‘असे’ ब्लॉक करा Paytm अकाउंट, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *