Headlines

Smartphone Tips: मित्रांना फोन देतांना ऑन करा ‘ ही’ सेटिंग, स्मार्टफोनमधील महत्वाची माहिती पाहुच शकणार नाही

[ad_1]

नवी दिल्ली: Smartphone Safety : फोन किती महत्त्वाचा आहे आणि त्यात तुमचा किती महत्वाचा डेटा असतो हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. असे असूनही, काही वेळा तुम्हाला तुमचा फोन दुसऱ्याला द्यावा लागतो. पण, ती व्यक्ती तुमच्या फोनमध्ये असलेला डेटा पाहणार तर नाही किंवा चोरणार नाही, अशी भीती नेहमीच असते. अशात, तुम्ही एक सेटिंग करून तुमची भीती दूर करू शकता. यासाठी तुम्ही स्क्रीन पिनिंग वापरू शकता. स्क्रीन पिनिंग हे स्मार्टफोनमध्ये एक अतिशय उपयुक्त फीचर आहे. स्क्रीन पिनिंग हे अँड्रॉइड स्मार्टफोनमधील एक फीचर आहे. ज्याद्वारे तुम्ही फोनच्या स्क्रीनवर विशिष्ट अॅप पिन करता. म्हणजेच यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला फक्त एकाच अॅपमध्ये प्रवेश करण्याची परवानगी असते. इतर युजर्स फक्त तुम्ही पिन केलेले अॅप वापरण्यास सक्षम असतात . याशिवाय, इतर सर्व Apps लॉक केले जातात.

वाचा: बेस्टच ! Samsung Galaxy Watch 4 च्या किमतीत ‘इतक्या’ हजारांची कपात, वॉच प्रत्येकाला खरेदी करता येणार

स्क्रीन पिनिंग कसे करावे ?

तुम्हाला Android फोनमधील सेटिंग्जमध्ये Screen Pinning Feature मिळेल. सर्व प्रथम, फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि येथून सुरक्षा निवडा. अनेक फोनमध्ये हे फीचर आता अधिक आत बनवण्यात आले आहे. तुम्हाला सिक्युरिटीमधील सिक्युरिटी फीचरवर जावे लागेल. याशिवाय, अनेक फोनमध्ये फीचरचे नावही बदलण्यात आले आहे. काहींमध्ये विंडोजच्या नावाने पिन येऊ शकते. काहींमध्ये अॅपच्या नावाने पिन येऊ शकते. येथून तुम्हाला स्क्रीन पिनिंगचा पर्याय चालू करावा लागेल. येथे तळाशी तुम्हाला दुसरा पर्याय दिसेल. जो अनपिन करताना पासवर्डचा असेल. ते पण चालू करा.

वाचा: Aadhar Card Update: आधार कार्डमधील फोटो आवडला नसेल तर ‘असा’ करा अपडेट, प्रोसेस खूप सोपी

आता तुम्ही बाहेर येऊ शकता म्हणजे होम स्क्रीन. यानंतर, तुम्हाला पिन करायचे असलेले अॅप उघडा. अॅप ओपन केल्यानंतर, तुम्हाला होम स्क्रीनवर दिलेल्या Recent App वर क्लिक करावे लागेल. सर्व उघडलेले अॅप्स येथे दिसतील. आता तुम्हाला पिन करायचे असलेल्या अॅपचे आयकॉन दाबा आणि धरून ठेवा. यासोबतच तळाशी अनेक पर्याय येतील. तळाशी तुम्हाला पिन या अॅपचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. अॅप पिन केले जाईल आणि दुसरी व्यक्ती केवळ तेच App वापरू शकेल.

वाचा: आता थिएटरची मजा घरीच ! अवघ्या ६५०० रुपयांत मिळतोय ब्रँडेड Smart TV, पाहा ऑफर्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *