Headlines

Smartphone Tips: या चुकांमुळे कमी होते स्मार्टफोनचे लाईफ, सोपी ट्रिक्स फॉलो केल्यास फोन चालेल वर्षानुवर्षे,

[ad_1]

नवी दिल्ली:Smartphone Tips: आजच्या या हायटेक काळात जवळ-जवळ सर्वांकडेच स्मार्टफोन असतो. ऑनलाइन शॉपिंग किंवा अगदी सरकारी समस्या. शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या मदतीने आजकाल सहज होतात .स्मार्टफोनचा वापर करायला आवडत असेल तरी , ते वापरताना,काही गोष्टींची विशेष काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमचा फोन लवकर खराब होऊ शकतो. अशा स्थितीत तुमच्या स्मार्टफोनची लाईफ खूपच कमी होते. याशिवाय, त्यात अनेक समस्या येऊ शकतात किंवा अनेक फंक्शन्स काम करणे बंद करू शकतात. अशा परिस्थितीत मोबाईल फोन वापरणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज अशाच काही चुकांबद्दल जाणून घेऊया, ज्या स्मार्टफोनचे लाईफ कमी करतात.

वाचा: Top Smartphones: ‘हे’ स्वस्त स्मार्टफोन्स बजेटची घेतात काळजी, फीचर्सच्या बाबतीत महागड्या स्मार्टफोन्सना देतात टक्कर, पाहा लिस्ट

फास्ट चार्जर वापरू नका:

तुम्ही तुमचा स्मार्टफोन त्याच्या मूळ चार्जरने चार्ज करत नसून जर फास्ट चार्जर वापरत असाल. तर , सावध व्हा. असे केल्याने तुमचा फोन लवकरच खराब होऊ शकतो. म्हणून तुमचा स्मार्टफोन नेहमी त्याच्या मूळ चार्जरने चार्ज करा.

सुरक्षिततेची काळजी घ्या:

अनेकदा आपला फोन चुकून खाली पडतो. अशा परिस्थितीत, फोन खराब होऊन आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. असे होऊ नये याकरिता आपल्या फोनवर कव्हर ठेवा.

वाचा: Jio चा Best Selling प्लान, रॉकेट सारखा स्पीड,अनलिमिटेड डेटासह १२ OTT Apps चे मोफत सब्सक्रिप्शन

स्टोरेज :

अनेकदा लोक त्यांच्या स्मार्टफोनचे स्टोरेज पूर्णपणे Occupied ठेवतात. असे केल्याने मोबाईल फोनच्या हेल्थवर वाईट परिणाम होतो. याशिवाय, फोनचे स्टोरेज जास्त वापरल्यास फोन लवकर हँग होऊ लागतो. या कारणास्तव, तुम्ही फोन मेमरी फ्री ठेवली पाहिजे.

ओव्हर चार्ज :

अनेक यूजर्स रात्री झोपताना स्मार्टफोन चार्जींगवर ठेवून झोपतात. असे केल्याने फोनची चार्जिंग क्षमता खराब होऊ शकते. याशिवाय तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारच्या समस्याही येऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमचा स्मार्टफोन कधीही जास्त चार्ज करू नका.

वाचा: UPI Tips: फोन हरविल्यास किंवा चोरी गेल्यास घाबरुन न जाता ‘असे’ Deactivate करा UPI अकाउंट, पाहा प्रोसेस

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *