Headlines

Smartphone Tips : स्लो स्मार्टफोनचे टेन्शन विसरा, स्पीड होणार सुपरफास्ट, फॉलो करा ‘या’ सोप्पी टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Smartphone Performance: जर तुमचा स्मार्टफोन बराच जुना असेल, तर तुम्हाला त्यात काही परफॉर्मन्स संबंधी समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. फोनचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी अनेक घटक असतात. ज्यामुळे कालांतराने, डिव्हाइस स्लो व्हायला लागते. अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स वापरून तुमच्या अँड्रॉइड फोनचा वेग वाढवू शकता. फॅक्टरी रीसेट हा तुमच्या फोनचा वेग वाढवणारा सर्वोत्तम पर्याय आहे. यानंतर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन रीसेट करावा लागेल. यात थोडा वेळ लागेल. पण, एकदा तुम्ही तुमचा स्मार्टफोन रीसेट केल्यावर तुम्हाला त्याच्या स्पीडमध्ये मोठा फरक जाणवेल.

वाचा: स्मार्टफोन युजर्सची चांदी ! Samsung ते iPhone , प्रत्येक बजेटच्या स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त ऑफ, पाहा लिस्ट

फोनचे अॅप्स लवकर उघडतील, मल्टी-टास्किंग सोपे होईल आणि तुम्ही नवीन डिव्हाइस वापरत आहात असे तुम्हाला वाटेल. तुम्हाला प्रथम तुमचा सर्व डेटा बॅकअप घ्यावा लागेल. तुम्ही Google Photos वर सर्व फोटो आणि व्हिडिओ सहज अपलोड करू शकता. संपर्क Gmail मध्ये सेव्ह केले जाऊ शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या फोनवर तुमच्या Google Account लॉग इन कराल तेव्हा तुमचे संपर्क आपोआप रिस्टोअर केले जातील.

नवीन सॉफ्टवेअर अपडेट करा:

स्मार्टफोन युजर्सनी सॉफ्टवेअर अपडेट्स कधीही चुकवू नये. कारण, ते अनेक इश्युज फिक्स करण्यात आणि स्थिरता आणण्यात मदत करतात. ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारे चांगली कामगिरी मिळेल. या व्यतिरिक्त, कधी- कधी नवीन फीचर्स देखील मिळतात. ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन अनुभव आणखी चांगला होतो.

वाचा: Smartphone Offers: Samsung चा १३ हजारांचा बेस्टसेलर फोन मिळतोय फक्त ९,४९९ रुपयात; पाहा ऑफर

तुमचे स्टोरेज क्लियर ठेवा:

तुमच्या फोनची स्टोरेज स्पेस क्लियर ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा सिस्टम मंदावेल. तुम्ही प्रथम सेटिंग्ज विभागात उर्वरित स्टोरेज तपासावे आणि जर ते Occupied असेल, तर तुमच्या फोनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याचे कारण असू शकते.

अॅप्सचे लाइट व्हर्जन वापरा:

तुम्ही इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सारख्या हेवी अॅप्सची लाइट व्हर्जन इन्स्टॉल करण्याचा विचार करू शकता. Lite Versions कमी डेटा वापरतील. जलद लोड करतील आणि प्रतिसाद सुधारेल. याशिवाय, तुम्ही प्ले स्टोअरमध्ये अॅप्ससाठी ऑटो-अपडेट्स देखील बंद करू शकता.

वाचा: Smart TV Offers: ५ हजारांनी स्वस्त मिळतोय पॉप्युलर कंपनीचा ३२ इंचाचा Smart TV, सुरूय सेल, पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *