Headlines

स्मार्टफोन स्लो झालाय ? काळजी नको , असा वाढवा स्पीड, पाहा सोप्पी टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Improve Smartphone Speed:इंटरनेटवर कॉल करण्यापासून ते ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यापर्यंत, स्मार्टफोनचा वापर आता रोजच्या कामात व्हायला लागला आहे. पण, जास्त वापर आणि जड डाउनलोडिंगमुळे फोन अनेकदा स्लो आणि संथ होतात आणि कधी कधी हँग होतात. तुम्हालाही जर अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल आणि तुमच्या स्मार्टफोनचा स्पीड वाढवायचा असेल. तर, आज आम्ही काही भन्नाट टिप्स तुमच्यासोबत शेयर करणार आहोत. ज्या तुमच्या डिव्हाइसचा स्पीड वाढवण्यास मदत करतील.

वाचा: मनसोक्त करा शॉपिंग ! स्वस्तात घरी पोहोचतील Smartphones- Smart TV सह अनेक भन्नाट प्रोडक्टस, पाहा डिटेल्स

फोन कॅशे डेटा :

तुम्ही तुमच्या फोनमध्ये जे काही करता ते RAM मध्ये कॅशेच्या स्वरूपात संग्रहित आणि सुरक्षित केले जाते. उदाहरणार्थ, वेबसाइट उघडल्यास, तुमचा फोन काही डेटा सेव्ह करेल जेणेकरून पुढच्या वेळी url जलद लोड होईल. काही वेळा फोनमध्ये खूप जागा लागते जी गॅलरीत दिसत नाही. अशात , तुम्हाला फक्त कॅशे किंवा जंक फाइल्स क्लियर कराव्या लागतील. तुमच्या फोनवरील कॅशे डेटा साफ करण्यासाठी: सेटिंग्ज > स्टोरेज > कॅशे > कॅशे क्लियर करा पर्याय > कन्फर्म करा वर जा. ही पद्धत काही रॅम क्लियर करेल आणि फोनचा वेग वाढवेल.

वाचा: Flipkart Sale : आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत मिळणार ‘हे’ दमदार स्मार्टफोन्स, iPhone वरही जबरदस्त डिस्काउंट

ब्लोटवेअर आणि अॅप्स काढा:

फोनचा स्पीड वाढवण्यासाठी जर तुम्ही अॅप अनइंस्टॉल करू शकत नसाल तर ते डिसेबल करा. असे करण्यासाठी – सेटिंग्ज > अॅप्स आणि प्रोग्राम्स > तुम्हाला अक्षम करायचे असलेले अॅप उघडा > डिसेबल पर्यायावर क्लिक करा आणि कन्फर्म करा.

सॉफ्टवेअर अपडेट करा

ते Android असो किंवा iOS, ऑपरेटिंग सिस्टीम अधिक चांगले काम करण्यासाठी आणि कोणत्याही बगचे निराकरण करण्यासाठी कंपन्या नियमितपणे अपडेट्स जारी करत असतात. जर तुम्ही तुमचा फोन नवीन रिलीझ केलेल्या सॉफ्टवेअरसह अपडेट केला नसेल. तर तुमचा फोन स्लो होण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. फोन वायफायशी कनेक्ट करा, सेटिंग्ज वर जा > फोनबद्दल उघडा किंवा सिस्टम अपडेट > अपडेट शोधा आणि इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू करा.

अॅप्सचे लाईट व्हर्जन वापरा:

तुम्ही जुना किंवा कमी किमतीचा फोन वापरत असल्यास, अॅप्सचा मोठा आकार स्टोरेज आणि परफॉर्मन्सवरही परिणाम करू शकतो. तुम्हाला फक्त या अॅप्सचे लाईट व्हर्जन इंस्टॉल करायचे आहे. हे अॅप्स कमी मेमरी घेतील आणि वापरण्यास देखील सोपे आहेत. तुम्ही फक्त अॅप स्टोअरवर जाऊन अॅप्स इंस्टॉल करू शकता.

वाचा: हटके डिझाईनसह येणारा Nothing Phone (1) ५००० रुपयांनी स्वस्त, पाहा आता कितीमध्ये मिळणार ?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *