Headlines

Smartphone Battery : नुकसान टाळण्यासाठी मोबाईलच्या बॅटरी हेल्थकडे द्या लक्ष, ‘असे’ करा चेक ‘या’ टिप्सने वाढवा बॅकअप

[ad_1]

नवी दिल्ली: Smartphone Battery Life : आजच्या या हायटेक आणि डिजिटल युगात स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज आहे. अनेक कामं मोबाईलवर करण्यात येत असल्यामुळे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे बॅटरीही लवकर संपते. पण, जर तुमचा फोन गरजेपेक्षा जास्त बॅटरी वापरत असेल आणि तुम्हाला फोनच्या बॅटरी बॅकअपची काळजी वाटत असेल तर, ही विशेष माहिती तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला फोनची बॅटरी हेल्थ कशी तपासायची आणि बॅटरी बॅकअप कसा वाढवायचा ते सांगणार आहोत. यात काही सोप्पी टिप्सची मदत घेता येईल. महत्वाचे म्हणजे सर्व स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ आणि तापमान तपासण्याचा पर्याय नाही. अशा परिस्थितीत युजर्सना Third Party Apps ची मदत घ्यावी लागते.

वाचा: डेटा यूजर आहात ? Airtel च्या ‘या’ रिचार्जमध्ये मिळतो रोज २ GB डेटा, सोबत Disney+ Hotstar, Amazon Prime फ्री

Samsung सारखे काही Android ब्रँड तुम्हाला बॅटरी तपशील जाणून घेण्यासाठी काही पर्याय देतात. परंतु, ते पुरेसे नाहीत. बॅटरी हेल्थ आणि तापमानाच्या अचूक माहितीसाठी, तुम्ही Google Play Store वरून Accu Battery अॅप डाउनलोड करावे लागेल . हे अॅप वापरण्यास सोपे आहे आणि बॅटरीशी संबंधित अचूक आणि अचूक माहिती देखील देते.

वाचा: Smartphone offers : ३ हजार रुपयांच्या ऑफसह खरेदी करा ‘हा’ लेटेस्ट Oppo स्मार्टफोन, फोनमध्ये ११ GB पर्यंत रॅम-८०W चार्जिंग

फोनची बॅटरी फक्त ८० टक्के पर्यंत चार्ज करावी असा सल्ला कायमच दिला जातो. कारण, जास्त वेळ पूर्ण चार्ज केल्याने बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि बॅटरी लवकर खराब होऊ शकते. या अॅपच्या मदतीने तुम्ही हे काम सहजपणे करू शकता आणि battery Health व्यवस्थापित करू शकता. Accu Battery अॅपवर, तुम्ही बॅटरी चार्जिंग स्तरावर आधारित अलार्म सेट करू शकता. ८० टक्के अलार्म सेट केला असेल तर फोनची बॅटरी ८० टक्के चार्ज झाल्यावर हे अॅप अलार्म वाजवायला सुरुवात करेल.

हे अॅप चार्जिंग आणि गेमिंग दरम्यान बॅटरीचे तापमान देखील तपासते आणि तापमान ५० अंशांपेक्षा जास्त झाल्यावर अलर्ट देखील करते. यासोबतच, हे अॅप बॅटरी आणि चार्जिंगशी संबंधित सर्व तपशील देखील रेकॉर्ड करते. ज्यामुळे तुम्ही Smartphone Battery Life, चार्जिंगची वेळ आणि तापमान कधीही पाहू शकता. या अॅपमध्ये तुम्हाला डीप स्लीप फीचर देखील मिळेल. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप आणखी वाढवू शकता.

वाचा: Flipkart Big Saving Days मध्ये ‘या’ ३२ इंचाच्या Smart TV वर मिळणार मोठा डिस्काउंट, उद्यापासून सेल

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *