Headlines

सिंगर जस्टिन बीबरचा चाहत्यांना मोठा धक्का, गंभीर आजाराशी झुंज; चाहते चिंतेत

[ad_1]

मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सुट्टीवर गेला आहे. सतत कॉन्सर्ट करणारा जस्टिन आता आपल्या शरीराला काही काळ विश्रांती देत ​​आहे. याचं कारण म्हणजे तो दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. जस्टिन बीबरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला  रामसे हंट सिंड्रोम झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे त्याच्या अर्ध्या चेहऱ्यावर पॅरालिसिस झाला आहे.  

इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करून जस्टिन बीबरने चाहत्यांना सांगितलं आहे की, तो त्याचा कॉन्सर्ट शो का रद्द करत आहे. व्हिडिओमध्ये जस्टिन म्हणाला… ‘हा आजार मला एका विषाणूमुळे झाला आहे. जो माझ्या कामावर आणि चेहऱ्याच्या नसांवर अटॅक करत आहे. यामुळे मला माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे पॅरॅलिसीस झाला आहे. तुम्ही बघू शकता की, माझा एक डोळा हलत नाही. मला या बाजूने हसूही येत नाही आणि या बाजूने माझं नाकही हलत नाही.

जस्टिन बीबरला झालेला दुर्मीळ आजार Ramsay Hunt Syndrome नक्की काय?

जस्टिन बीबरचे काही चाहते त्याचा आगामी शो रद्द केल्याने प्रचंड संतापले होते. चाहत्यांना संदेश देत जस्टिनने सांगितलं की, तो सध्या स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकत नाही. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. याबद्दल त्याने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, ‘ही गोष्ट खूप गंभीर आहे, तुम्ही बघू शकता…

माझी इच्छा आहे की कदाचीत असं झालं नसतं, मात्र माझ्या शरीराने मला सांगितलं आहे की, मी थोडे शांत राहवं. मला आशा आहे की, तुम्ही लोकं मला समजून घ्याल आणि मी हा वेळ विश्रांतीसाठी आणि आराम करण्यासाठी काढणार आहे. जेणेकरून मी 100 टक्के बरा होऊ शकेन आणि परत येईन.

चाहते जस्टिनसाठी प्रार्थना करत आहेत
जस्टिनने त्याच्या चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर, तो लवकरच बरा होऊन परत येईल, असं आश्वासन दिलं. जस्टिनने सांगितलं की, तो डॉक्टरांनी सांगितल्यानुसार चेहऱ्याचा व्यायाम करत आहे जेणेकरून त्याचा चेहरा पुन्हा एकदा सामान्य होऊ शकेल. किती वेळ लागेल माहीत नाही पण देवावर श्रद्धा आहे. असं तो म्हणाला. जस्टिन बीबरचे चाहते आणि हॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्याला लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *