Headlines

Shukrawar Che Upay: कार्तिक महिन्यातील शुक्रवारी करा हे काम, एका रात्रीत व्हाल श्रीमंत

[ad_1]

Shukrawar Che Upay : ज्योतिष शास्त्रामध्ये पैशाशी संबंधित समस्या किंवा कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कार्तिक महिन्यातील शुक्रवार खूप खास असतो. (Kartik Month Remedies) या दिवशी केलेला हा एक उपाय तुमचे आयुष्य बदलू शकतो.  प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतो. पण एवढे करुनही अनेक वेळा माणसाला अपेक्षित परिणाम मिळत नाही. जर तुमचाही यात समावेश असेल तर तुम्ही ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कार्तिक महिना हा लक्ष्मी देवीचा खास महिना आहे. या महिन्यात केलेले प्रत्येक काम खूप चमत्कारिक सिद्ध होते. 

कार्तिक महिन्याचे आणि शुक्रवारचे दिवस खूप खास असतात. अशा परिस्थितीत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. (Maa Lakshmi Totka) ज्योतिष शास्त्रात अशा खास प्रसंगांसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. आज हा उपाय दिवसभरात केव्हाही करा आणि मगच चमत्कार पाहा. 

शुक्रवारी करण्याचा हा उपाय

ज्योतिष शास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. विशेषत: पर्सचा हा एक उपाय खूप फायदेशीर ठरु शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला संपत्ती आणि अपार संपत्ती मिळवायची असेल, तर तुमच्या पर्समध्ये ठेवलेली ही एक वस्तू तुमच्यासाठी लकी ठरु शकते. 

ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पर्समध्ये सोन्या-चांदीचे नाणे ठेवा. परंतु हे उपाय करताना हे लक्षात ठेवा की पर्समध्ये सोन्या-चांदीचे नाणे ठेवण्यापूर्वी ते देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. तसेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहो अशी प्रार्थना करा. असे केल्याने तुमची पर्स कधीही रिकामी होणार नाही आणि आयुष्यात कधीही पैशाची समस्या जाणवणार नाही.

एक बाब ध्यानात ठेवा

पर्समध्ये सोने-चांदी ठेवण्यापूर्वी हे ध्यानात ठेवा की, नियमानुसार लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी गरीब आणि गरजूंना मदत करा. त्यांना अन्न द्या. या दिवशी दान केल्याने देवाची कृपा होते असे म्हणतात. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी दान करत राहा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *