Headlines

सहकलाकारांनी माझी रॅगिंग केली; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

[ad_1]

Sai Ranade : लहाणपणी आपणं अनेकदा पाहतो की आपली मोठी भावंड ही नेहमीच लहाणांची छेड काढतात, त्यांच्यासोबत मस्ती करतात. अनेकदा त्यांना त्रासही देतात. हे फक्त आपल्याच घरात नाही तर सगळ्यांच्याच घरातलं आहे. फक्त हे इथेच थांबत नाही तर शाळेत किंवा कॉलेजमध्ये देखील आपण बऱ्याचवेळा पाहतो की सिनियर्स हे ज्युनिअर्सची मस्ती पाहतो. ही मस्ती म्हणजे मित्र-मैत्रिणींमध्ये असणारी नाही तर रॅगिंग असते. असंच काही आपण मालिका आणि चित्रपटांमध्ये आपण पाहतो. 

आजकाल सगळेच कलाकार हे मिळून मिसळून राहतात हे आपण सोशल मीडियावर पाहत असतो. पण बऱ्याचवेळा हे चित्र फक्त सोशल मीडिया पूर्ती असते तर ते खऱ्या आयुष्यात नसते. याविषयी बोलताना मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री सई रानडेसोबत देखील असा प्रकार घडल्याचं तिनं सांगितलं. सई रानडे तिच्या माहोल मुली असा एक ग्रुप त्यांनी केला आहे. त्यात त्या मराठी भाषेतील शब्दांसाठी वऱ्हाडी भाषेतील पर्यायी शब्द सांगताना दिसतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. अशात आता माहोल मुलींनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सईनं अभिनय क्षेत्रातील रॅगिंगविषयी सांगितलं आहे. यावेळी सई या मुलाखतीत म्हणाली की ‘मी सिनेसृष्टीत जेव्हा पदार्पण केलं, तेव्हा माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझ्या सहकलाकारांनी माझी रॅगिंग केली. यात भार्गवी चिरमुले नव्हती. पण मी यामुळे इतकी कंटाळले होते की मी सिनेसृष्टी सोडून पुण्याला जाण्याच्या विचार करत होते. त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये देखील होते. खरंतर मी या सगळ्याचा धसका घेतला होता.’

याविषयी पुढे बोलताना सई म्हणाली, ‘तेव्हा मी ठरवलं की मी इथे फ्रेंडशिप करायला आले नाही. मी माझं काम करणार आणि बाजूला होणार, हे मी ठरवलं होत. माझे मित्र-मैत्रिणी वेगळे आहेत, माझा नवरा आहे, कुटुंब आहे, त्यात मी खूप आनंदी होते. मी पहिल्यांदा जेव्हा पुढचं पाऊल मालिकेच्या सेटवर गेले, तेव्हा तिथे अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार होते. या सर्वांसमोर आपल्याला नीट काम करायला हवं. नाहीतर इथेही आपलं रॅगिंग होऊ शकतं, असं मला वाटू लागलं होतं. भार्गवी चिरमुलेबरोबर मी पहिली मालिका केली. त्यात ती मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती आणि मी नकारात्मक पात्र साकारत होते. त्यावेळी मला इतर जे सहकलाकार आहेत, त्यांनी प्रचंड त्रास दिला होता. त्यामुळे मी या सर्वांपासून थोडी लांब राहायचे.’

हेही वाचा : ’20 लोकांसमोर टॉपलेस अन् पाय पसरवून…’, मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेच्या आयोजकांवर लैंगिक शोषणाचे आरोप

पुढे सई म्हणाली की ‘मला त्यावेळी असं वाटायचं की आपलं काही तरी किंवा सगळंच चुकलेलं आहे. आपण माणूस म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणूनही चुकलेलो आहोत. आपलं मुंबईत येणंच मुळात चुकलेलं आहे. त्यामुळे मी आपलं काम करुया, घरी जाऊया, इतरांशी काहीही संबंध नको असं ठरवलं होतं. पण मग काही काळानंतर माझी आणि भार्गवीची मैत्री झाली.’ सई रानडे विषयी बोलायचं झालं तर तिनं मॉडेलिंगनं करिअरची सुरुवात केली. सईची पहिली मालिका ही वहिनीसाहेब होती. त्यानंतर सईनं मागे वळून पाहिलं नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *