Headlines

‘चित्रपटाच्या बदल्यात ठेवण्यात आली अशी अट’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

Aditi Govitrikar On Casting Couch : बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊच्या बळी ठरल्या आहेत. हे इंडस्ट्रीचं काळं सत्य आहे. याच प्रकरणात आता माजी मिसेस इंडिया आणि अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कास्टिंग काऊबाबत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

खरंतर, आजकाल आदिती गोवित्रीकर तिच्या अनोख्या ब्यूटी कॉन्टेस्टमुळे चर्चेत आहे. ती लवकरच त्याचं आयोजन करणार आहे. अलीकडेच, आजतकला दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीबद्दल आश्चर्यकारक खुलासे केले.

अदिति गोवित्रिकरने बॉलिवूडबाबत केले धक्कादायक खुलासे
अदिती म्हणाली, ‘मला कधीही अभिनेत्री किंवा मॉडेल बनायचं नाही. मी नेहमीच डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलं होतं आणि मी त्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. मी बराच काळ मॉडेलिंगही केलं आहे. हे क्षेत्र महिलांसाठी चांगलं आहे आणि मला याचा अभिमान आहे. पण बॉलिवूडचा प्रवास माझ्यासाठी इतका सोपा नव्हता. मी खूप कमी चित्रपट केले आहेत. याचं कारण म्हणजे मी त्या इंडस्ट्रीत कम्फर्टेबल राहू शकले नाही.

कास्टिंग काऊचची झाली शिकार
कास्टिंग काऊबद्दल अदिती म्हणाली, ‘जेव्हा मला माझं नशीब आजमावायचं होतं, तेव्हा मला कास्टिंग काऊचसारख्या गोष्टींचा सामना करावा लागला. एका अपघाताने मला हादरवून सोडलं होतं. मला खूप मोठ्या चित्रपटाची ऑफर देण्यात आल्या होत्या, पण त्या बदल्यात मला तडजोड करण्यास सांगण्यात आलं. जर मी हे केले असतं तर आज मी इंडस्ट्रीमध्ये एक लिस्टर अभिनेत्री असते. पण मी हे केले नाही कारण माझ्यावर इंडस्ट्रीत टिकायचं आहे असं कोणतंही दडपण नव्हतं. माझ्याकडे अनेक पर्याय होते आणि मला माझ्या निर्णयांची जाणीव होती.

फॅशन, मॉडलिंग तसेच अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरच्या मोहक सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही अदिती तितकीच फिट आणि सुंदर दिसते. आजही रॅम्पवॉकवर अदितीने एँट्री केली की उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळतात. एव्हरग्रीन अदितीने मिस वर्ल्डचा देखील किताब पटकावला आहे. अदितीची ड्रेसिंग स्टाइल, तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज देखील लावता येत नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *