Headlines

धक्कादायक! प्रसिद्धीच्या झोतात असतानाच ‘या’ गायकाने उचललं टोकाचं पाऊल, रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

[ad_1]

Punjabi Singer Ranjit Sidhu Suicide: मनोरंजन क्षेत्रातून एकामागे एक अशी वाईट बातमी समोर येत आहे. आता पंजाबी लोक संगीत गायक रणजीत सिद्धू यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल 30 जून रोजी रात्री रणजीत सिद्धू यांच शव रेल्वे ट्रॅकजवळ मिळालं आहे. रणजीत सिद्धू सुनाम येथे राहत होता. मीडिया रिपोर्ट्स नुसार, रणजीत सिद्धू याचं नातेवाईकांना त्रासून आत्महत्या केली आहे.  

रणजीत सिद्धू यांच्या आत्महत्येच्या बातमीनंतर पंजाबी म्यूजिक इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. रिपोर्ट्सनुसार, जीआरपी जगविंदर सिंग आणि एसआई नरदेव सिंग यांनी सांगितलं की पोलिसांना 30 जून रोजी रेल्वे ट्रॅकजवळ त्यांचे शव मिळाले होते. हा मृतदेह ओळख पटवण्यासाठी जीआरपी पोलीस चौकीत ठेवण्यात आला होता. जेव्हा पोलिसांनी तपास केला तर माहिती समोर आली की शव नछत्तर सिंग यांचा मुलगा पंजाबी रणजीत सिंग उर्फ रणतीत सिद्धू आहे. 

रिपोर्टनुसार, रणजीत सिद्धू यांच्या पत्नीचेही वक्तव्य समोर आले आहे. रणजीत सिद्धू यांच्या पत्नीने आरोप केला आहे की रणजीत सिद्धू यांचे नातेवाईकांशी भांडण सुरू होते. त्यांचे नातेवाईक त्यांचा सतत छळ करत होते. नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळूनच रणजीत सिद्धू यांनी आत्महत्या केली. रणजीत सिद्धू यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, काही काळापूर्वीच त्यांनी आपल्या लेकीचे लग्न लावून दिले होते. तेव्हांपासून त्यांचे काही नातेवाईकांशी भांडण सुरू होते. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचे पोस्टमार्टमही करण्यात आले. रणजीत सिद्धू यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

कोणत्याही कलाकारानं आत्पहत्या करण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी कोरोना काळात अनेक कलाकारांनी बिकट परिस्थितीमुळे आत्महत्या केली होती. त्यात अनेक मालिकांमधील कलाकार होते. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या निधनानं वेधले. त्यांच्या निधनानं अनेकांच्या नजरा वळल्या होत्या. त्यावेळी त्यानं खरचं आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली यावर अजूनही वाद सुरुच आहेत. 

हेही वाचा : ‘आदिपुरुष’नंतर आता प्रेक्षकांचा भेटीला Hanuman चित्रपट, 11 भाषांमध्ये होणार प्रदर्शित

दरम्यान, 29 जून रोजीच आशा नाडकरणी यांचे निधन झाले. त्यांच्या वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रख्यात दिग्दर्शक व्हि. शांताराम यांनी ‘ मौसी ‘ या चित्रपटात आशाजी यांना प्रथम अभिनेत्रीच्या रुपात काम दिले. त्यांना ही संधी वयाच्या 15 वर्षांच्या होत्या तेव्हा मिळाली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *