Headlines

धक्कादायक : वयाच्या १४ व्या वर्षी शारिरीक अत्याचार; सलमान खानच्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री सोमी अलीने काही दिवसांपूर्वी सलमान खानवर अनेक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. सोमी अलीने सलमान खानवर हा आरोप करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. सलमान खान आणि सोमी अली एकमेकांना डेट करायचे. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी तिने भारतात न येण्याचं कारण सलमान खान असल्याचेही म्हटलं होतं. तिला सलमान खानसोबत लग्न करायचं होतं. नुकताच सोमी अलीने एक नवीन व्हिडिओ शेअर करून धक्कादायक खुलासा केला आहे.

सलमान खानवर आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी सोमीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तुम्ही इतके दिवस गप्प का राहिलात, हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याचंही अनेकांनी सांगितलं. आता सोमी अलीने व्हिडिओ शेअर करत तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितलं. यावेळी तिने हा पब्लिसिटी स्टंट करत असल्याचं बोलणाऱ्यांनाही उत्तर दिलं आहे.

व्हिडिओमध्ये सोमी अली म्हणाली, वयाच्या ९व्या वर्षी माझं लैंगिक शोषण झालं. इतकंच नाही तर सोमीने सांगितलं की, वयाच्या 14 व्या वर्षी एका पाकिस्तानी कुकने तिच्यावर बलात्कार केला आणि लैंगिक अत्याचार केले. सलमान खानने माझी माफी मागावी, असंही सोमी अलीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. आता सोमी अलीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली (Somi Ali) एकेकाळी भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. सोमी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेच असते. सोमीनं अलीकडेच काही पोस्ट शेअर करत सलमान खानवर गंभीर आरोप केले होते. सोमीनं पुन्हा एकदा डिसेंबर 2022 मध्ये एक पोस्ट शेअर करत सलमानवर आरोप केले होते की अभिनेत्यानं तिचे फक्त शोषण केले नाही तर सिगारेटचे चटके देखील द्यायचा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *