Headlines

शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी मुख्यमंत्री शिंदेंसोबत किती?; केसरकर म्हणाले, “आम्हाला तर असं वाटतंय की, सर्व खासदारांनी..” | deepak kesarkar on how many shivsena mp support rebel eknath shinde group scsg 91

[ad_1]

महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसहीत बंड पुकारुन राज्यात भाजापसोबत सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेच्या खासदारांसंदर्भातील उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे खासदारही शिंदे गटामध्ये सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनाही यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेचे किती खासदार शिंदे गटासोबत आहेत असा प्रश्न मुंबईतील पत्रकार परिषदेत केसरकरांना विचारण्यात आला. या प्रश्नावर केसरकारांनी सविस्तर उत्तर दिलं.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘गरज पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढून शिंदे गटाला रोखू’ वक्तव्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही आधी…”

केंद्रातील जबाबदारीवर विचारण्यात आला प्रश्न…
झालं असं की केसरकर यांना दिल्लीमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी दिली तर स्वीकारणार का अशा अर्थाने प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तर होणार असल्याचं संकेत दिले आहेत. मात्र असं असतानाच दुसरीकडे केसरकर यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भात आज थेट प्रश्न केसरकर यांना विचारण्यात आला असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये आपल्याला केंद्रात काम करण्यासंदर्भातील काही जबाबदारी दिली गेल्यास ती आपण नक्कीच स्वीकारु असं म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

पत्रकार परिषदेमध्ये केसरकर यांना शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार २० जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर येतेय असा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना केसरकर यांनी तारखेबद्दल खुलासा केला नाही मात्र मुख्यमंत्री म्हटले म्हणजे लवकरच विस्तार होईल असं स्पष्ट केलं. पुढे याच मुद्द्यावरुन पत्रकाराने केसरकरांना केंद्रातील जबाबदारीसंदर्भातील चर्चांवरुन प्रश्न विचारला. कॅबिनेटचा विस्तार होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणालेत. मात्र तुम्हाला केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते असी चर्चा आहे. तर तुम्ही केंद्रामध्ये जबाबदारी देण्यात आली तर स्वीकारण्यासाठी तयार आहात का? असा प्रश्न केसरकरांना विचारण्यात आला.

नक्की वाचा >> राज ठाकरे – फडणवीस भेटीदरम्यान उपस्थित असणाऱ्या नांदगावकरांचं युतीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पवार साहेबांनी…”

केंद्रात जबाबदारी दिली तर…
या प्रश्नाला उत्तर देताना, “ही जबाबदारी खासदारांना देण्यात यावी अशी माझी इच्छा आहे. शिवसेना बऱ्याच काळापासून एनडीएचा सदस्य राहिला आहे. शिवसेनेचे खासदार चार ते पाच वेळा निवडून आले आहेत,” असं केसरकर म्हणाले. मात्र पुढे बोलताना त्यांनी आपल्याला यासंदर्भात विचारणा झाली तर आपण ती जबाबदारी नाकारणार नाही असंही सांगितलं. “कोणी जर जबाबदारी दिली तर नाही म्हणता येणार नाही. कारण जे लोक आपल्यावर जबाबदारी देतात ते फार मोठे लोक असतात. त्यांना नाही म्हणता येत नाही,” असं केसरकर म्हणाले. त्यामुळे सर्व काही जुळून आलं आणि केसरकरांना केंद्रामध्ये जबाबदारी सोपवण्यात आली तर सिंधुदुर्गचे आमदार मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचं यावरुन स्पष्ट झालं आहे.

नक्की वाचा >> “चांगला मुख्यमंत्री कसा असतो हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं पण बरोबर असणाऱ्या…”; केसरकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर फोडलं खापर

शिवसेनेच्या खासदारांना संधी देण्याची मागणी…
“जबाबदारी नाकारता येत नसली तरी मला मात्र असं वाटतं की जे आमचे खासदार आहेत त्यांच्याकडे फार कौशल्य आहे. ते चांगलं काम करु शकतात. शिवसेनेनं पुन्हा एनडीएचा सदस्य व्हायला हवं. जे राज्यात झालं ते राष्ट्रीय स्तरावरही झालं पाहिजे असं मानणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. असं झालं तर आम्हाला सर्वांना आनंद होईल. २५ वर्षांपासून मित्रपक्ष असणारे पक्ष एकत्र येऊन भारताच्या विकासात सहकार्य देत असतील तर सामाधानाची बाब आहे,” असं केसरकर म्हणाले.

नक्की वाचा >> …अन् देवेंद्र फडणवीस हसून म्हणाले, “…म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही”; सभागृहात पिकला एकच हशा

१९ खासदारांपैकी किती मुख्यमंत्री शिंदेंसोबत आहेत?
केसरकरांनीच दिल्लीमध्ये संधी द्यायचीच असेल तर शिवसेनेच्या खासदारांचा आधी विचार करावा असं मत व्यक्त केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना, शिंदे गटासोबत किती खासदार आहेत? १९ खासदारांपैकी किती मुख्यमंत्री शिंदेंसोबत आहेत? असे प्रश्न केसरकर यांना विचारण्यात आले. त्यावर केसरकरांनी थेट आकडेवारीमध्ये न जाता सर्व आमदार आणि खासदारांनी एकत्र असावं अशी शिंदे गटाची भूमिका असल्याचं म्हटलं. “आम्हाला तर असं वाटतंय की सर्व खासदारांनी एकत्र रहावं, आमदारांनी एकत्र रहावं. आमच्या पक्षप्रमुखांचा आशिर्वाद आमच्यावर असावा असं मला वाटतं,” अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली.

नक्की वाचा >> त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या…”

शिवसेना-भाजपाची युती भारतभरामध्ये उदाहरण होती
“बाळासाहेब ज्या भूमिकेत होते त्या भूमिकेत कोणीतरी असावं ऊर्जा देणारं. उद्धव ठाकरेंमध्ये ती क्षमता आहे. त्यांचे आशिर्वाद कायम मिळावेत, पाठिंबा मिळावा या सरकाराल असं वाटतं. शिवसेना-भाजपाची युती भारतभरामध्ये उदाहरण होती. वेगवेगळे लढून ते एकत्र आले आता तर एकत्र निवडणुका लढल्या होत्या त्यांनी. मग ते आता का एकत्र येऊ शकत नाही?” असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *