Headlines

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील होणार? जाणून घ्या पूर्ण नावं | including bhavana gawali rahul shewale shivsena 12 mp to join eknath shinde group know all names

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. या बंडखोरीनंतर आमदारांसह अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. दरम्यान आमदारानंतर शिवसेनेचे १२ खासदारदेखील बंडखोरी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. हे खासदार आज (सोमवार १८ जुलै) शिंदे गटाने आयोजित केलेल्या बैठकीलाही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (१९ जुलै) दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्या या दौऱ्यादरम्यान शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडू शकते, असा दावा केला जातोय.

शिंदे गटात सामील होण्याची शक्यता असलेले १२ खासदार कोण ?

१) भावना गवळी
२) राहुल शेवाळे
३) हेमंत गोडसे
४) धैर्यशील माने
५) संजय मांडलिक
६) राजेंद्र गावित
७) श्रीरंग बारणे
८) श्रीकांत शिंदे
९) सदाशिव लोखंडे
१०) प्रताप जाधव
११) कृपाल तुमाणे
१२) हेमंत पाटील

तो अधिकार गद्दारांना नाही

एकीकडे शिवसेनेतील १२ खासदार बंडखोरी करणार असल्याचे म्हटले जात असतानाच शिंदे गटाने शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यावर मत व्यक्त करत शिंदे गटाला कार्यकारिणी जाहीर करण्याच अधिकार नसल्याचे म्हटले आहे. “शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला बरखास्त करण्याचा अधिकार या गद्दारांना नाही. त्यांनी शिवसेनेची कार्यकारिणी बघावी, तपासावी आणि मगच याबाबतचा निर्णय घ्यावा. २० जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे आमचे लक्ष आहे,” असे विनायक राऊत म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *