Headlines

Shivsena Sanjay Raut reaction after former corporator Eknath Shinde joined the group abn 97

[ad_1]

राज्यात सत्तांतर घडवून आणणाऱ्या बंडाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्के बसू लागले आहेत. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६, तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता आमदारानंतर नगरसेवकही शिंदे गटात सामील होत आहे. याबाबत बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ही चुकीची माहिती आहे असे म्हटले आहे.

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आम्ही जी झेप घेऊ त्यातून महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल. लोक शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले आहेत, असे म्हटले आहे.

“ही चुकीची माहिती आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथे आता कोणीही नगरसेवक नाही. इथे प्रशासक आहेत. नगरसेवक गेले असे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांना परत निवडून यावे लागेल त्यानंतर ते नगरसेवक होतील. या तिन्ही भागांमध्ये शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे चुकीची माहिती देऊन अफवा पसरवू नका. सरकार बदलले असले तरी अजून अफवेला मान्यता मिळालेली नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

“जब खोने के लिए कुछ भी न बचा हो, तो…”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट!

“आता आमच्यासाठी आकाश खुले आहे. आता आम्ही जी झेप घेऊ त्यातून महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल. लोक शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले आहेत. मातोश्रीने भरभरून दिले त्याबाबतीत जो प्रकार झाला आहे तो महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. हे दिल्लीचे कारस्थान आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *