Headlines

shivsena mla ambadas-danve-criticized-sanjay-gaikwad on threat-warning-to-shivsena-workers-in-buldhana

[ad_1]

बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शनिवारी शिंदेगट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. या इशाऱ्याला आता शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे. हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर या”, असे आव्हान त्यांनी संजय गायकवाड यांना दिलं आहे.

हेही वाचा- “हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी विवाहसंस्थांची मदत, २००० रुपयात खोटी प्रमाणपत्रं”; नितेश राणेंचे गंभीर आरोप

“संजय गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर यावे. मग कळेल कोण चून चून के मारेल आणि कोण गिन गिन के मारेल”, असा इशारा दानवेंनी गायकवाडांना दिला आहे.

काय म्हणाले होते संजय गायकवाड?

शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश करत आम्हीच शिवसेना असा दावा करत गोंधळ घातला. यात दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांत भिडले. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण पसरले होते.

हेही वाचा- “दुसरं कुणी मोठं झालेलं सुप्रिया सुळेंना बघवत नाही” गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

राड्यानंतर गायकवाडांचा शिवसैनिकांना इशारा
या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. ज्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणार, असेही गायकवाड म्हणाले आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. शनिवारी झालेल्या राड्यात पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर तेव्हाच हिशोब चुकता केला असता, असेही गायकवाड म्हणाले आहेत. पुन्हा राडा केल्यास आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *